Jammu Kashmir Assembly Elections

Jammu Kashmir Assembly Elections | Jammu Kashmir Assembly Elections News in Marathi | जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होणार आहेत. यंदा तीन टप्प्यांमध्ये या निवडणुका होणार आहेत. १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोंबर रोजी हे मतदान पार पडेल. निकाल ८ ऑक्टोंबर रोजी लागेल. तत्पूर्वी २०१९ साली जम्मू काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून घेऊन तिथे राष्ट्रपती राजवट लावण्यात आली होती. ६ वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष , कॉंग्रेस या राष्ट्रीय पक्षांच्या सोबतच नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी हे प्रमुख प्रादेशिक पक्ष निवडणुका लढवत आहेत. एकूण ९० जागांवर या निवडणुका होतील. यातील ४७ जागा या काश्मीर तर ४३ जागा जम्मू येथील आहेत.
Marathi News Esakal
www.esakal.com