Sheikh Hasina
शेख हसीना या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आहेत. बांगलादेशमधील आवामी लीगच्या त्या प्रमुख आहेत. शेख हसीना या भारताच्या मित्र म्हणून ओळखल्या जातात. २०२४ च्या जानेवारीमध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा विजय झाला होता अन् त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. पण, देशातील आंदोलनामुळे त्यांना ऑगस्ट २०२४ मध्येच पदाचा राजीनामा द्यावा लागला.