Solar Eclipse

Solar Eclipse News - जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून दिसणाऱ्या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. सूर्यग्रहणाबद्दल फार पूर्वीपासून नोंदी ठेवलेल्या आढळतात. सूर्यग्रहण हे अमावस्या दिवशी दिसते. परंतु सर्वच अमावस्या दिवशी सूर्यग्रहण दिसत नाही.दुर्बिण किंवा द्विनेत्रीद्वारे तज्ज्ञ वगळता कुणीही ग्रहण पाहू नये. साध्या डोळ्यांनी कधीही ग्रहण पाहू नये. त्यामुळे आंधळेपणा येऊ शकतो. सूर्य ग्रहणाचे 3 प्रकार आहेत. खग्रास सूर्यग्रहण,खंडग्रास सूर्यग्रहण आणि कंकणाकृती सूर्यग्रहण. जेव्हा सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात.जेव्हा सूर्याचा काही भागच चंद्राच्या पाठीमागे जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात.जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याच्या प्रकाशाला झाकून टाकतो तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला मिळते.
Marathi News Esakal
www.esakal.com