Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

हरिद्वारच्या कुंभमेळ्याला 'या' 12 राज्यांतील लोकांना बंदी; RT-PCR असेल, तरच मिळणार राज्यात प्रवेश

Published on

सातारा : कोरोना महामारीच्या काळात हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याला सुरू झाली आहे. जगातील सर्वात मोठा हा उत्सव मानला जातो. या उत्सवात देश आणि जगातील अनेक लोक सहभागी होतात. असे मानले जाते, की शाही स्नानाच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये एक डुबकी मारल्यास त्या व्यक्तीची सर्व पापं धुली जातात. यानिमित्ताने गंगेसह पवित्र नद्यांमध्ये लोक आवर्जुन स्नान करतात. दरम्यान, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे संक्रमित लोकांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. यामुळे राज्य सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. जर तुम्हीही शाही स्नानासाठी हरिद्वारला जाण्याची तयारी करत असाल, तर नवीन नियम जरुर जाणून घ्या..

आपल्या सर्वांना माहितच आहे, की हरिद्वार हे भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. इतर दिवशीही भाविक या स्थळाला आवर्जुन भेट देतात. याशिवाय पर्यटकही मोठ्या संख्येने हरिद्वारला भेट देण्यासाठी येतात. हे लक्षात घेता, राज्य सरकारने कोरोना निगेटिव्ह चाचणी अहवाल 12 राज्यांतील लोकांसाठी अनिवार्य केला आहे. याअंतर्गत पर्यटक आणि भाविकांना त्यांच्यासोबत RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल आणणे बंधनकारक असेल. याबाबत अधिक माहिती देताना सीएम तीरथ सिंह म्हणाले, की सर्व भाविकांना गृह मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.

या वृत्तानुसार महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तामिळनाडू, हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि राजस्थानमधील लोकांना हरिद्वार प्रवेशासाठी RT-PCR निगेटिव्ह चाचणी आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याच वेळी, RT-PCR निगेटिव्ह चाचणी 72 तास आधीची असावी. जर एखाद्या व्यक्तीकडे आरटी-पीसीआर चाचणी अहवाल 72 तासांपेक्षा जुना नसेल, तर त्याला / तिला हरिद्वारमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. दरम्यान, हरिद्वारमध्ये 12, 14, 27 एप्रिल रोजी शाही स्नान होणार असून या दिवशी भाविक मोठ्या संख्येने या स्थळाला भेट देण्यासाठी येतात. त्यासाठीच हे कठोर नियम बनविण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()