नवी दिल्ली : रशिया-युक्रेन संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी ४६ टक्के भारतीय त्यांचा हवाई प्रवासाचा प्लॅन रद्द करू शकतात, असे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. तेलाच्या किमती USD 120 प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्यानेआणि त्यापेक्षा जास्त वाढ होण्याची शक्यता असल्याने देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय विमान भाड्यात 30 ते 60 टक्क्यांनी तीव्र वाढ झाली आहे, असे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. तरीही ज्यांना प्रवास करायचा आहे ते रस्ते आणि समुद्र मार्गाचे पर्याय शोधत आहेत, सर्वेक्षण एजन्सी लोकल सर्कलने (agency LocalCircles) अहवाल दिला.
भारताच्या देशांतर्गत विमान वाहतूक उद्योगाला गेल्या 2 वर्षात साथीच्या रोगाचा मोठा फटका बसला आहे. सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी हवाई क्षेत्र उघडण्यास विलंब केल्यामुळे बहुतेक लोक साथीच्या रोगाच्या नव्या लाट पसरल्यानंतर घरीच राहिले.
देशातील 321 जिल्ह्यांतील 20,000 हून अधिक सहभागींनी दिलेल्या उत्तरांवर (respondents )आधारित 23 फेब्रुवारी रोजी लोकल सर्कल सर्वेक्षणात असे दिसून आले होते की, सरकारने निर्बंध कमी केल्यानंतर 59 टक्के ग्राहक मार्च-मे दरम्यान प्रवास करण्याची योजना आखत आहेत.
परंतु रशिया-युक्रेन संघर्षानंतर, वाढत्या विमानभाड्यांचा त्यांच्या प्रवास योजनांवर कसा परिणाम झाला हे जाणून घेण्यासाठी लोकल सर्कल पुन्हा त्या सहभागी नागरिकांकडे गेली. याला देशातील 301 हून अधिक जिल्ह्यांतील ग्राहकांकडून 10,389 प्रतिसाद मिळाला. सहभागींपैकी ६२ टक्के पुरुष होते तर ३८ टक्के महिला होत्या. ४९ टक्के सहभागी Tier 1 शहरातील, 34 टक्के Tier 2 मधील आणि 17 टक्के Tier 3, 4 आणि ग्रामीण जिल्ह्यांमधून होते.
46% प्रवासी एकतर प्रवास योजना रद्द करतील किंवा प्रवासाचा पर्यायी मार्ग स्वीकारतील
या उन्हाळ्यात विमानाने प्रवास करण्याची योजना आखत असलेल्यांपैकी 46 टक्के लोक एकतर योजना रद्द करतील किंवा वाहतुकीचा पर्यायी मार्ग स्वीकारतील. 32 टक्के लोक इतर पर्याय शोधत होते, तर 14 टक्के त्यांच्या योजना पूर्णपणे रद्द करत होते.
सर्वेक्षणात असे आढळून आले की, केवळ 14 टक्के नियोजित वेळेनुसार प्रवास करतील ज्यांनी विमान भाडे वाढण्यापूर्वी मार्च-मेसाठी तिकीट बुक केले होते. 26 टक्के किमती वाढल्यानंतरही लवकरच बुक करतील, तर 14 टक्के त्यांच्या योजना पुढे ढकलतील.
कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा लगेच कमी होण्याची शक्यता नसल्यामुळे, या उन्हाळ्यात एअरलाइन्सच्या उत्पन्नात जवळपास 40 ते 50 टक्क्यांची घट होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.