पर्यटकांसाठी महत्वाची बातमी! इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर प्रशासन सतर्क; सवतसडा धबधबा, अडरे धरणावर घातली बंदी

चिपळूण तालुक्यात अडरे येथील धरण व धबधबा, सवतसडा ही दोन पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
Sawatsada waterfall and Adare dam in Chiplun
Sawatsada waterfall and Adare dam in Chiplunesakal
Updated on
Summary

धबधब्याखाली भिजण्यासाठी एक सुरक्षित ठिकाण म्हणून अडरेचा धबधबा प्रसिध्द आहे.

चिपळूण : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत (Raigad Irshalwadi) घडलेल्या दुर्घटनेनंतर चिपळूण तालुक्यातील (Chiplun) सवतसडा (Sawatsada Waterfall) आणि अडरे धरणाच्या परिसरात निसर्गप्रेमींना बंदी घालण्यात आली आहे. ६ ऑगस्टपर्यंतही बंदी जारी राहील.

Sawatsada waterfall and Adare dam in Chiplun
कोल्हापूरला महापुराचा धोका? पंचगंगेच्या पाणी पातळीत किती वाढ, काळम्मावाडी-राधानगरीची काय आहे स्थिती? जाणून घ्या..

चिपळूण तालुक्यात अडरे येथील धरण व धबधबा, सवतसडा ही दोन पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाणे आहेत. दरवर्षी या ठिकाणी हजारो पर्यटक भेट देतात. महामार्गालगत असणारा सवतसडा धबधबा व अडरे येथील धबधब्याच्या ठिकाणी मुंबई, पुण्याहून व जिल्हा-परजिल्ह्यातून अनेक लोक येतात आणि वर्षा सहलीचा आनंद घेतात.

यावर्षी पावसाळा उशिरा सुरू झाल्यामुळे सवतसडा धबधबा उशिरा प्रवाहित झाला. त्यामुळे अडरेतील धरण आणि सवतसडा धबधब्याकडे पर्यटकांची पावले उशिरा वळले. २३ जुलैपर्यंत येथे पर्यटक निसर्गाचा आनंद घेत होते; मात्र रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत घडलेल्या दुर्घटनेनंतर या दोन्ही ठिकाणी जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.

Sawatsada waterfall and Adare dam in Chiplun
महाराष्ट्राचे मिनी काश्मीर महाबळेश्वरमध्‍ये सर्वाधिक 104 मिलिमीटर पाऊस; कोयनेतून 1 हजार 50 क्‍युसेक पाण्‍याचा विसर्ग

महसूल विभागाने याबाबत रविवारी सायंकाळी उशिरा मनाई आदेश काढले. दोन्ही ठिकाणी जाणाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना पोलिसांना करण्यात आली आहे. अडरे येथील धरण परिसर निसर्गरम्य आहे. धरण भरल्यानंतर सांडव्यातून पाणी उलटून बाहेर आल्यावर पुढच्या ठिकाणी नैसर्गिक धबधबा निर्माण झाला आहे.

धबधब्याखाली भिजण्यासाठी एक सुरक्षित ठिकाण म्हणून अडरेचा धबधबा प्रसिद्घ आहे. मुले व महिलांसाठीदेखील हा धबधबा सुरक्षित आहे; मात्र दोन वर्षांपूर्वी येथे एकाचा बुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे वर्षानुवर्षे या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांच्या आनंदावर या वर्षीही विरजण पडले आहे.

Sawatsada waterfall and Adare dam in Chiplun
Balinga Bridge : महापुराचा धोका! कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील 'या' महत्वाच्या पुलावरून आजपासून वाहतूक पूर्णपणे बंद

राज्यात प्रसिद्ध

तालुक्यातील अडरे येथील धरण व धबधबा, सवतसडा ही दोन स्थळे पावसाळी पर्यटनासाठी राज्यात प्रसिद्ध आहेत. दरवर्षी या ठिकाणी हजारो पर्यटक भेट देतात. महामार्गालगत असणारा सवतसडा धबधबा व अडरे येथील धबधब्याच्या ठिकाणी मुंबई, पुण्याहून व जिल्हा-परजिल्ह्यातून अनेक लोक येतात आणि वर्षा सहलीचा आनंद घेतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.