Taj Mahal : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी; 'या' दिवशी पहिल्यांदाच राहणार ताजमहाल बंद, काय आहे कारण?

12 फेब्रुवारीला दोन्ही स्मारकं बंद राहणार असल्याचं यापूर्वी सांगण्यात आलं होतं.
Agra Taj Mahal
Agra Taj Mahalesakal
Updated on
Summary

नव्या माहितीनुसार 11 फेब्रुवारीला आग्रा किल्ला आणि 12 फेब्रुवारीला ताजमहाल सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत बंद राहणार आहे.

Agra News : आग्र्यामध्ये पहिल्यांदाच ताजमहाल (Agra Taj Mahal) आणि आग्रा किल्ला (Agra Fort) दिवसभर बंद राहणार आहे. या दरम्यान पर्यटकांची (Tourists) निराशा होणार आहे.

कारण, 11 फेब्रुवारीला आग्रा किल्ला आणि 12 फेब्रुवारीला ताजमहाल G-20 प्रतिनिधींच्या भेटीसाठी सामान्य पर्यटकांकरिता बंद राहणार आहे. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत लोकांना इथं प्रवेश बंदी असणार आहे. 12 फेब्रुवारीला दोन्ही स्मारकं बंद राहणार असल्याचं यापूर्वी सांगण्यात आलं होतं.

फेब्रुवारी महिन्यात G-20 देशांचे प्रतिनिधी आग्र्यात येणार असून 10 मार्चपर्यंत त्यांचा इथं मुक्काम असणार आहे. इथं अनेक महत्त्वाच्या बैठका देखील होणार आहेत. याकाळात आग्रा किल्ला, ताजमहाल सर्वसामान्य पर्यटकांसाठी बंद राहणार आहे.

Agra Taj Mahal
Agniveer Recruitment : 'अग्निवीर' भरती प्रक्रियेत होणार मोठा बदल; जाणून घ्या सैन्यात कशी मिळवता येणार नोकरी?

पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. राजकुमार पटेल यांनी सांगितलं की, यापूर्वी 12 फेब्रुवारीला दोन्ही स्मारकं बंद ठेवण्याची सूचना देण्यात आली होती. मात्र, आता नव्या माहितीनुसार 11 फेब्रुवारीला आग्रा किल्ला आणि 12 फेब्रुवारीला ताजमहाल सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत बंद राहणार आहे. 11 फेब्रुवारीला बैठकीसोबतच G-20 चे प्रतिनिधी आग्रा किल्ल्याला भेट देतील. त्यानंतर ते ताजमहालला भेट देणार आहेत.

Agra Taj Mahal
Political News : आता निवडणुका झाल्यास शिंदे-फडणवीसांचं सरकार कोसळणार; माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं भाकित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.