अमरनाथला जाताय? प्रवास सुखकर होण्यासाठी 'या' 10 गोष्टी लक्षात ठेवा

अमरनाथ यात्रा सुरू केल्यानंतर या १० गोष्टी लक्षात ठेवा.
अमरनाथला जाताय? प्रवास सुखकर होण्यासाठी 'या' 10 गोष्टी लक्षात ठेवा
Updated on

अमरनाथ (Amarnath Cave) यात्रेची नोंदणी आजपासून (ता.११) सुरू झाली आहे. गेल्या दोन वर्षाची प्रतिक्षा संपली असून अनेकजन आता यात्रेच्या तयारीला लागले आहेत. यासाठी बुकिंग सुरु झालं आहे. कोणतीही यात्रा अथवा लांबची टूर करत असताना छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. यासाठी काय पाहावे आणि कसे जावे याचा पहिला अभ्यास करा. ज्यामुळे तुम्हाला त्रास ही होणार नाही आणि तुमचे पैसेही वाचतिल. याशिवाय यात्रा सुरु करताना १० गोष्टी लक्षात ठेवा ज्यामुळे तुमची यात्रा चांगली होईल आणि आनंदही घेता येईल. चला तर जाणून घेऊया.

अमरनाथ यात्रेला जाण्यापू्र्वी आधीच एक महिना तयारीला लागा. कारण चढ चढताना तुम्हाला त्रास नाही होणार. यासाठी तुमच्या फिटनेसकडे लक्ष द्या. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किमान ४-५ किमी चालण्यास सुरुवात करा. योग, प्राणायाम आणि दीर्घ श्वासोच्छ्वासाचा सराव करा. डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या. तुमच्या सभोवतालच्या गिर्यारोहण क्षेत्रात चढण्याचा आणि उतरण्याचा सराव करा.

अमरनाथला जाताय? प्रवास सुखकर होण्यासाठी 'या' 10 गोष्टी लक्षात ठेवा
अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी करताय? जाणून घ्या महत्त्वपूर्ण माहिती

काय पाहावे आणि कसे जावे

बालटाल रोडने अमरनाथ गुहेकडे जाण्याचा मार्ग

बालटाल ते अमरनाथ गुहेपर्यंतचा मार्ग हा चढाईचा तसेच खडतर आहे. अमरनाथ गुहा बालटालपासून १४ किलोमीटर अंतरावर आहे. तुम्हाला दर्शनानंतर लवकर परतायचे असेल तर एक सर्वोत्तम मार्ग आहे. तुम्ही कॅब किंवा बसने जाऊ शकता. कॅब किंवा बसने १० तासात जम्मूहून बालटालला पोहचू शकता. बालटाल ते अमरनाथ गुहेच्या वाटेवर एक दिवसाचा ट्रेक केल्यानंतर परत दर्शन घेता येते.

पहलगाम रोडने अमरनाथ गुहेकडे जाण्याचा मार्ग

पहलगामहून अमरनाथ गुहेत जाण्यासाठी साधारण २-३ दिवस लागतात. पहलगाम ते अमरनाथ हा डोंगरी मार्ग बालटालच्या मार्गापेक्षा अधिक गुळगुळीत आणि सपाट आहे. कॅब किंवा बसने 7 तासात जम्मूहून पहलगामला पोहोचता येते.

अमरनाथला जाताय? प्रवास सुखकर होण्यासाठी 'या' 10 गोष्टी लक्षात ठेवा
उन्हाच्या झळा, थंड हवेच्या ठिकाणी करा लग्न सोहळा

श्रीनगरला असे जाता येते

श्रीनगरला जाण्यासाठी वयक्तिक कारने किंवा बसने जाता येते. याठिकाणी डायरेक्ट रेल्वे सुविधा नाही. तुम्ही ट्रेनने जम्मू तवी आणि उधमपूरला सहज पोहोचू शकता. या दोन्ही स्थानकांवर उतरल्यानंतर तुम्ही बस किंवा टॅक्सीने श्रीनगरला जाऊ शकता. दिल्ली, पंजाब आणि हरियाणाच्या अनेक शहरांमधून श्रीनगरला थेट बसेस आहेत. जम्मूच्या जवळपास प्रत्येक मोठ्या शहरातून थेट बस आहे. याशिवाय लेह- कटरा ते श्रीनगरलाही बसेस धावतात. दिल्ली, चंदीगड आणि मुंबई सारख्या अनेक मोठ्या शहरांमधून श्रीनगरला थेट विमानसेवा उपलब्ध आहे.

अमरनाथ यात्रा सुरू केल्यानंतर या १० गोष्टी लक्षात ठेवा.

  • महिलांना साडी नेसणे सोयीचे होणार नाही, त्यांनी सलवार-कमीज, पॅंट-शर्ट किंवा ट्रॅक सूट घालून प्रवास करावा.

  • अमरनाथ ट्रेकिंग चप्पल घालून अजिबात करू नका. रस्ते निसरडे आहेत त्यामुळे लेस असलेले ट्रॅकिंग शूज वापरा.

  • तुमचे सामान घेऊन जाणाऱ्या पोर्टरच्या आजूबाजूला राहा, जेणेकरुन तुम्हाला आवश्यक असल्यास बॅगमधून काहीही काढता येईल.

  • पहलगाम आणि बालटालच्या पलीकडे प्रवासात तुमच्यासोबत अतिरिक्त कपडे आणि खाद्यपदार्थ सोबत ठेवा.

  • पाण्याची बाटली, काही स्नॅक्स जसे की भाजलेले हरभरे, ड्रायफ्रुट्स, टॉफी, चॉकलेट इत्यादी सोबत ठेवा.

  • सनबर्न टाळण्यासाठी कोणतीही मॉइश्चरायझर क्रीम आणि व्हॅसलीन सोबत ठेवा.

  • यात्रेत तुम्ही हरवणार नाही याची काळजी घ्या. कधीही एकटे फिरू नका. नेहमी सहप्रवाश्यांसोबत रहा.

  • आपत्कालीन परिस्थितीत तुमचे नाव, पत्ता आणि घरचा फोन नंबर नेहमी तुमच्या खिशात ठेवा. तुम्ही जोडीदारासोबत किंवा ग्रुपमध्ये जात असाल तर त्यांचा फोन नंबरही त्यात अॅड करा.

  • बेस कॅम्पमधून बाहेर पडताना तुमचा कोणी साथीदार हरवला असेल तर तत्काळ पोलिसांकडे तक्रार करा आणि त्या व्यक्तीला हरवल्याचे घोषित करा.

  • कोणत्याही शॉर्टकट मार्गाने प्रवास पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.