Ayodhya Ram Mandir : रामलल्लाचे दर्शन घ्यायचे असेल तर मंदिरात प्रवेश करण्याची वेळ आणि तारीख घ्या जाणून

प्राणप्रतिष्ठापणेचा सोहळा पार पडल्यानंतर आता भाविकांना प्रश्रू श्रीरामांचे दर्शन घेण्याची ओढ लागली आहे. आजपासून प्रभू श्रीरामांचे हे मंदिर सामान्य नागरिकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.
Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram Mandiresakal
Updated on

Ayodhya Ram Mandir : अयोध्येमध्ये मागील काही दिवसांपासून प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती. त्यामुळे, एक वेगळाच उत्साह अयोध्येत पहायला मिळाला होता. नुकताच २२ जानेवारीला (सोमवारी) अयोध्येतील नवीन मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडला.

हा सोहळा पार पडल्यानंतर आता भाविकांना प्रश्रू श्रीरामांचे दर्शन घेण्याची ओढ लागली आहे. हा सोहळा पार पडल्यानंतर आजपासून प्रभू श्रीरामांचे हे मंदिर सामान्य नागरिकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.

जर तुम्हाला ही अयोध्येतील प्रभू श्रीरामांचे दर्शन घ्यायचे असेल तर त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. हे दर्शन घेण्यासाठीची प्रक्रिया काय आहे? आणि दर्शन घेण्याची वेळ काय? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

Ayodhya Ram Mandir
Ram Mandir : देशातील 'या' शहरांमध्ये आहेत प्रभू श्रीरामाची प्रसिद्ध मंदिरे, एकदा नक्की भेट द्या

रामलल्लाचे दर्शन कधीपासून घेऊ शकता?

नुकताच 22 जानेवारीला अयोध्येतील नव्या मंदिरात प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा पार पडला. आजपासून अर्थात २३ जानेवारीपासून हे मंदिर आता सामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे, भाविकांना आता प्रभू श्रीरामांचे दर्शन घेता येणार आहे.

केवळ दर्शनच नाही तर भाविकांना आता प्रभू श्रीरामांच्या आरतीमध्ये देखील सहभागी होता येणार आहे. प्रभू श्रीरामांच्या या प्राणप्रतिष्ठापणेचा सोहळा पार पडल्यानंतर देशभरातील अनेक राज्यांमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला.

रामलल्लाच्या दर्शनासाठी लोकांची उत्सुकता पाहता अयोध्येत भाविकांची गर्दी होणार हे निश्चित आहे. रामजन्मभूमीवर हे मंदिर वसलेले असल्याने रामभक्तांसाठी या मंदिराचे महत्व अधिकच वाढले आहे. या मंदिरातील गर्भगृहात प्रभू श्रीरामांच्या बालस्वरूपातील मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. या मूर्तीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.

रामल्लाच्या आरतीची वेळ काय आहे?

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या अधिकृत वेबसाईटनुसार भाविक श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे दर्शन घेण्यासाठी सकाळी ७ ते ११:३०  पर्यंत येऊ शकतात. त्यानंतर, दुपारी २ ते ७ या वेळेत सायंकाळच्या दर्शनासाठी भाविक येऊ शकतात.

रामल्लाच्या दर्शनासोबतच तुम्ही प्रभू श्रीरामांच्या सकाळी आणि संध्याकाळी पार पडणाऱ्या आरतीमध्ये ही सहभागी होऊ शकता. पंरतु, यासाठी तुम्हाला पासेस बूक करावे लागतील. प्रभू श्रीरामांच्या आरतीसाठी मिळणारे पासेस मोफत आहेत. त्यासाठी, तुम्हाला आधी बुकिंग करून पास घ्यावा लागेल. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही या पासेसचे बुकिंग करू शकता.

ऑनलाईन पासचे बुकिंग तुम्हाला राम मंदिराच्या वेबसाईटवरून करता येईल आणि ऑफलाईन पद्धतीने बुकिंग करण्यासाठी तुम्ही प्रभू रामजन्मभूमीच्या कॅम्प ऑफिसमध्ये जाऊ शकता. यासाठी तुम्हाला वैध सरकारी ओळखपत्र दाखवावे लागेल. त्यानंतरच, तुम्हाला पास मिळेल.

प्रभू श्रीरामांच्या सकाळच्या शृंगार आरतीसाठी तुम्हाला एक रात्र आधीच बुकिंग करावे लागेल. तसेच, संध्याकाळच्या आरतीसाठी तुम्हाला अर्धा तास आधी मंदिरात जावे लागेल. जर तुमच्याकडे पास नसेल तर तुम्हाला मंदिरात प्रवेश मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे, रामल्लाचे दर्शन घेण्यासाठी आणि आरतीमध्ये सहभागी होण्यासाठी पासचे बुकिंग करा आणि तुमचे सरकारी ओळखपत्र सोबत ठेवायला विसरू नका.

Ayodhya Ram Mandir
Street Foods In Ayodhya : राम मंदिराच्या दर्शनाला जाताय ? फक्त अयोध्येतच चाखता येतील 'हे' खास स्ट्रीट फूड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.