Tourism : देशातील सर्वांत सुंदर रोमॅंटिक डेस्टिनेशन्स तुम्हाला माहिती आहेत का?

कताच पाऊस कमी झाला असल्याने आता सगळीकडे हिरवळीचे वातावरण आहे.
Tourism : देशातील सर्वांत सुंदर रोमॅंटिक डेस्टिनेशन्स तुम्हाला माहिती आहेत का?
Updated on

सध्या पावसाचे प्रमाण कमी होत आले आहे. अधून मधून एखादी सर येते मात्र आता पावसाळा कमी झाल्यामुळे लोक ट्रिप, पर्यटनसाठी बाहेर पडत आहेत. नुकताच पाऊस कमी झाला असल्याने आता सगळीकडे हिरवळीचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी पठारांवरील फुलांचे नजराने सुरु झाले आहेत.

अशाच रोमॅंटिक वातावरणात तुम्हीही फिरायला जायचा प्लॅन करत असाल तरी ही बातमी जरुर वाचा. कारण यामध्ये आम्ही तुम्हाला काही रोमॅंटिक ठिकाणांबद्दल माहिती देणार आहे. जिथे तुम्ही तुमच्या सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकता.

Tourism : देशातील सर्वांत सुंदर रोमॅंटिक डेस्टिनेशन्स तुम्हाला माहिती आहेत का?
तुम्हाला माहिती आहे का?, जायफळापासूनही मिळते चमकदार त्वचा...

केरळ

केरळला पूर्वेचं व्हेनिस समजलं जाते. येथील हाऊसबोटचा आनंद घ्यायला लोकांना फार आवडतं. साधारणत: डिसेंबर महिन्यात या ठिकाणी भेट देण्यासाठी पर्यटक उत्सुक असतात. कारण या काळात तेथील वातावरण अधिकच सुंदर आणि नयनरम्य असते. येथे असणारे चहाचे मळे, पर्वत आणि अनेक आकर्षक ठिकाणे पाहण्यासाठी येथे सर्वजण भेट देतात.

अंदमान निकोबार

चहुबाजूंनी समुद्रानं वेढलेली अंदमान निकोबार बेटं हनिमूनसाठी एक आकर्षक पर्याय ठरू शकतात. या हॉलिवूड स्टाईल डेस्टिनेशनवर तुम्ही जर हनिमूनसाठी जाण्यासाठी इच्छूक असाल तर बिनधास्तपणे अंदमान निकोबारला भेट देऊ शकता.

जम्मू-काश्मीर

देशातील हे अनेकांचे आवडते ठिकाण आहे. गुलमर्ग हे हनिमूनसाठी अतिशय उत्कृष्ट पर्वत, मुघल गार्डन आणि हिरव्यागार दऱ्यांमुळे प्रसिद्ध आहे. अनेक नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना येथील निसर्ग फिरण्यासाठी खुणावत असतो. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता.

Tourism : देशातील सर्वांत सुंदर रोमॅंटिक डेस्टिनेशन्स तुम्हाला माहिती आहेत का?
महिलांनो! वयाच्या चाळीशीनंतरही चेहरा ठेवा चमकदार, फॉलो करा स्किन केअर स्टेप्स

उत्तराखंड

उत्तराखंडमध्ये अनेक प्रसिद्ध अशी पर्यटनस्थळे आहेत जी अनेकांच्या मनाला भुरळ घालतात. येथे अनेक अशी ठिकाण आहे जी कमी बजेटमध्येही पाहता येतात. तुम्हाला जर रोमॅंटिक ठिकाणी जायचं असेल तर तुम्ही नक्की उत्तराखंडची निवड करु शकता. अनेक जोडप्यांना येथे एकांताचा आनंदही घेता येतो.

गोवा

हनिमूनसाठी गोवा हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. पाम वृक्षांनी वेढलेला समुद्रकिनारे, प्राचीन चर्च आणि जलक्रिडांसाठी ही काही गोव्याची वैशिष्ट्ये आहेत. तसेच तुम्हाला येथे अनेक प्रकारचे वेगवेगळ्या चवीचे पदार्थही खायला मिळतात. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेकजण याठिकाणी हजेरी लावतात.

गुजरात

गुजरातमध्ये हनिमूनसाठी कच्छ हे एक उत्तम ठिकाण आहे. खरेदीपासून ते नाईट लाईफपर्यंत अनेक गोष्टींचा आनंद तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता.

राजस्थान

शाही हनिमून साजरे करायचे असेल तर तुम्ही राजस्थान या पर्यायाची निवड करु शकता. तुमचे हनिमून रोमॅंटिक आणि रॉयर बनवायचे असेल तर हे ठिकाण बेस्ट आहे. येथे पर्यटकांना क्रूझपासून ते वाळवंट, उंटाच्या सवारीपर्यंत अनेक गोष्टींचा आनंद घेता येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.