North East Travel : उन्हाळ्याच्या सुट्टीतला आनंद द्विगुणीत करायचाय? मग, ईशान्य भारतातील 'या' थंड हवेच्या ठिकाणांना द्या भेट

North East Travel : ईशान्य भारत हा आपल्या देशाचा असा भाग आहे की, ज्याचे सौंदर्य पाहण्यासाठी दररोज लाखो पर्यटक भेट देतात.
North East Travel
North East Travelesakal
Updated on

North East Travel : एप्रिल महिन्याला सुरूवात झाली की, उन्हाचा तडाखा हळूहळू वाढायला सुरूवात होते. मे महिन्यामध्ये तर उन्हाचा पारा प्रचंड वाढतो. त्यामुळे, या उकाड्यामुळे मे महिन्यात फिरायला जाण्याचे काही जण टाळतात. त्याऐवजी, एप्रिल महिन्यात फिरायला जाण्यावर अनेकांचा भर असतो. शिवाय, याच महिन्यात मुलांच्या परीक्षा संपून त्यांना उन्हाळ्याची सुट्टी देखील लागते.

जर यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही देखील लांब कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर हा लेख शेवटपर्यंत वाचा. ईशान्य भारत हा आपल्या देशाचा असा भाग आहे की, ज्याचे सौंदर्य पाहण्यासाठी दररोज लाखो पर्यटक भेट देतात. यामध्ये विदेशातील पर्यटकांचा ही समावेश आहे.

अरूणाचल प्रदेश, मेघालय ते नागालॅंडपर्यंतच्या राज्यांमध्ये अशी अनेक सुंदर आणि नयनरम्य ठिकाणे आहेत. जिथे फिरायला जाणे, हे प्रत्येकाचे स्वप्न असू शकते. जर तुम्हाला थंड हवेच्या परिसरात मनसोक्त फिरायचे असेल, तर त्यासाठी ईशान्य भारतातील काही ठिकाणे बेस्ट आहेत. आज आम्ही तुम्हाला त्यापैकीच काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. कोणती आहेत ही ठिकाणे? चला तर मग जाणून घेऊयात.

North East Travel
Summer Travel : एप्रिलमध्ये कुटुंबासोबत फिरण्यासाठी बेस्ट आहेत 'ही' ठिकाणे, उन्हाळ्यात मिळेल थंडावा

कोहिमा

कोहिमा हे शहर नागालॅंड राज्यात स्थित आहे. नागालॅंड राज्याची राजधानी असलेले हे शहर तेथील अप्रतिम निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. भारतातील सर्वात आकर्षक आणि नयनरम्य पर्यटनस्थळांमध्ये या कोहिमाचा समावेश आहे. समुद्रसपाटीपासून १ हजार मीटरपेक्षा अधिक उंचीवर वसलेले हे ठिकाण फिरण्यासाठी बेस्ट आहे.

उकाड्यापासून दूर आणि थंड हवेच्या ठिकाणी निवांत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. कोहिमामध्ये तुम्ही ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता आणि येथील इतर प्रेक्षणीय पर्यटनस्थळांना ही तुम्ही भेट देऊ शकता. (Kohima)

गंगटोक

सिक्कीम या राज्याची राजधानी असलेले हे शहर पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. येथील उंच पर्वतरांगा, अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि अल्हाददायक वातावरण पर्यटकांना भुरळ घालते. ईशान्य भारतातील थंड हवेचे ठिकाण म्हणून गंगटोक प्रसिद्ध आहे.

हिवाळ्यात या ठिकाणी बर्फवृष्टी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे, उन्हाळ्यातही येथील तापमान खूपच कमी असते. तलाव, धबधबे, उंच पर्वत, घनदाट जंगले या ठिकाणच्या सौंदर्यात आणखी भर घालतात. गंगटोकमध्ये आल्यावर तुम्ही अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटीजचा ही आनंद घेऊ शकता. (Gangtok)  

North East Travel
Summer Travel : अ‍ॅडव्हेंचरप्रेमींसाठी बेस्ट आहेत 'ही' महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे, कडक उन्हाळ्यात वाटेल गारेगार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.