Tourism: रोजच्या धकाधकीच्या जीवनातून प्रत्येकाला स्वत:साठी आणि बाहेर फिरायला जाण्यासाठी वेळ मिळतो तो फक्त हॉलीडेजमध्ये. अनेकांना विदेशात फिरण्याची आवड असते. सामान्यत: फक्त भारतीय हिंदी किंवा मराठी भाषिक वर्ग दुसऱ्या देशात जायला फार विचार केवळ यासाठी करतात कारण तिथे त्यांच्या भाषेत बोलणारी माणसं नसतात. मात्र हिंदी भाषिक काही देशांबद्दल तुम्हाला कळलं तर निश्चितच आनंद होईल. तुम्ही या देशांमध्ये सहज फिरायला जाऊ शकता.
होय! असे काही देश आहेत जेथे बऱ्या प्रमाणात हिंदी भाषिक लोक आहेत. चला तर जाणून घेऊया अशा देशांबद्दल.
नेपाळ
भारताच्या शेजारी असणाऱ्या नेपाळ या देशात जगभऱ्यातील प्रवासी फिरायला येतात. या देशातील मोठी लोकसंख्या हिंदी बोलणारी आहे. हा देश भारताच्या जवळ असल्या कारणाने भारत आणि नेपाळच्या संस्कृतीमध्ये बरंच साम्य बघायला मिळतं. आणि येथील प्रेक्षणीय स्थळांबाबत बोलायचं झाल्यास काठमांडू, चितवन नॅशनल पार्क, बोधनाथ आणि मंकी टेंपल ही काही प्रेक्षणीय स्थळे या देशांत आहेत.
युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका
या देशाचं नावही हिंदी भाषा बोलणाऱ्या वर्गामध्ये येतं. येथे सहा लाख पन्नास हजार लोक हिंदी बोलणारे आहेत. त्यामुळे तुम्हाला या देशात फिरता फिरताही हिंदी भाषिक व्यक्ती भेटू शकतो. जर तुम्हाला थोडी फारही इंग्रजी येत असेल तर तुम्हाला या देशात फिरणं सोपं पडेल.
सिंगापूर
भारतीय चित्रपटांमध्ये तर अनेकदा सिंगापूर ट्रिप प्लान करताना सेलिब्रिटींना तुम्ही बघितलं असेल. मात्र भारतीय देखील यात मागे नाहीत. सिंगापूर अनेकांना ड्रिम डेस्टिनेशन असतं. या देशातही तुम्हाला बऱ्या प्रमाणात हिंदी भाषिक लोक मिळतील. आणि पर्यटन स्थळांबाबत बोलायचं झाल्यास सिंगापर फ्लायर. चाइनाटाउन, बोटानिक गार्डन आणि सिंगापूर जू ही काही प्रेक्षणीय स्थळे आहेत.
फिजी
हा एक असा देश आहे जेथे हिंदी भाषिक तुम्हाला मोठ्या प्रमाणात आढळतील. याशिवाय तुम्हाला ३०० पेक्षा जास्त द्वीप आणि त्यांची सफर करण्यात भरपूर आनंद मिळेल. फिजीत म्यूझियम, श्री सिवा सुब्रमन्यम स्वामी मंदिर, नाविलावा आणि स्नेक गोड केव ही प्रेक्षणीय स्थळे आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.