Tourism : कमी बजेटमध्ये फिरायचंय? नोव्हेंबर महिन्यात फिरण्यासाठी भारतातील ही ५ ठिकाणं बेस्ट

पर्यटन प्रेमींसाठी ही ठिकाणं बेस्ट आहे
Tourism News
Tourism Newsesakal
Updated on

Best Tourism Places In Low Budget : नोव्हेंबर महिन्यात सगळीकडे थंडीचे वातावरण असते. या महिन्यात अनेकांना बाहेर फिरायला आवडतं. या महिन्यात वातावरण थंड असल्याने कोणी ट्रॅकिंग, कोणी एडवेंचरस ठिकाणांना भेटी देतात. आज आम्ही तुम्हाला कमी बजेटमध्ये भारतातील कोणत्या पाच ठिकाणी जाता येईल ते जाणून घेऊया.

पुष्कर (राजस्थान)

राजस्थानमधील पुष्कर शहर, नोव्हेंबर महिन्यात फिरण्यासाठी बेस्ट आहे. पुष्कर मेळावा जगभरात प्रसिद्ध आहे. यात तुम्हाला उंटाची सफारी, शर्यत, वाळवंटाची सफारी इत्यांदींचा आनंद तुम्ही घेऊ शकता.

उज्जैन

अशी अनेक ठिकाणे आहे जिथे तुम्ही फिरायला जाऊ शकता. मध्य प्रदेशमधील उज्जैनला मात्र धार्मिक महत्व आहे. मध्यप्रदेशमध्ये फिरण्यासाठी नोव्हेंबर महिना उत्तम मानला जातो. महाकालेश्वर मंदिर हे येथील आकर्षणाचे मुख्य ठिकाण आहे.

Tourism News
Tourism News

कूर्ग (कर्नाटक)

दक्षिण भारतातील काश्मीर म्हणून कूर्गची ओळख आहे. कूर्ग हे ठिकाण कर्नाटकमध्ये असून भारतातील स्कॉटलँड अशीही या ठिकाणाची ओळख आहे. इथे असलेले लहान लहान हिल स्टेशन अगदी हिरवळ आणि प्राकृतिक सौंदर्याचा खजिना आहे. शांत ठिकाणी जायला ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी ही ठिकाणं बेस्ट आहेत.

Tourism News
Tourism News

हंपी (कर्नाटक)

कर्नाटक राज्यात पर्वतांच्या कडेकपारांत हंपी हे ठिकाण आहे. हंपीमध्ये अनेक मंदिरे आहेत ज्यांचे वास्तुकला, पौराणिक कथा आणि धार्मिक महत्व आहे. पर्टटन प्रेमींसाठी हे ठिकाण बेस्ट आहे.

Tourism News
Tourism News: गुजरातच्या या गावाला UNWTO कडून मिळाला 'बेस्ट टुरिझम व्हिलेज'चा पुरस्कार, वाचा खासियत

ऊटी (तामिळनाडू)

ऊटीला पर्वतांची राणी असेही म्हटले जाते. दक्षिण भारतातील तामिळनाडूमध्ये नीलगिरी पर्वतांमध्ये एक सुंदर हिल स्टेशन आहे. तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तर नोव्हेंबर महिन्यात तुम्ही या ठिकाणी आवर्जून भेट द्यायला हवी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.