Best Tourist Village : बेस्ट टुरिस्ट व्हीलेज बनण्याचा मान राजस्थानमधील या गावाला का मिळाला?

Best Tourist Village In Rajsthan : सुरक्षेच्या कारणास्तव आपण सर्वजण आपल्या घरांना कुलूप लावतो, पण देवमाळी हे एक गाव आहे जिथे लोक कधीही घराला कुलूप लावत नाहीत.
Best Tourist Village
Best Tourist Villageesakal
Updated on

Best Tourist Village :

भारतात अनेक गोष्टी बदलत आहेत. देश विकसीत होत आहे, देशातील अनेक गोष्टी बदलत आहेत. रस्ते, मोठ्या इमारतींनी आपला देश प्रगतशील होतोय. पण, आजही आपल्या देशातल्या काही गोष्टी आश्चर्यकारकर आहेत. आपल्या देशातील काही गावं अशी आहेत, जी आपल्याला बुचकळ्यात टाकतात.

Best Tourist Village
पीएमपीची पर्यटन बससेवा क्रमांक २ सुरू

राजस्थानमधील अजमेरमधील देवमाळी गाव सध्या प्रसिद्धीझोतात आले आहे. कारण या गावाला भारत सरकारने 'बेस्ट टुरिस्ट व्हिलेज'चा किताब दिला आहे. 27 नोव्हेंबर रोजी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात केंद्र सरकार या गावाचा या पुरस्काराने गौरव करणार आहे.

या गावात असं काय खास आहे, ज्यामुळे त्याला बेस्ट टुरिस्ट व्हिलेजचा किताब दिला आहे. याबद्दल अधिक जाणून घेऊयात.

देवमाळी गाव
देवमाळी गावesakal
Best Tourist Village
Diwali Vacation Tourism : दिवाळीची सुट्टी एन्जाॅय करण्यासाठी कोकणातील 'हे' ठिकाण आहे सर्वात बेस्ट!

भारतीय सांस्कृतिक वारसा आणि भगवान देवनारायण यांच्या भक्तीसाठी ओळखले जाणारे हे गाव आपल्या अनोख्या जीवनशैलीसाठी ओळखले जाते. देवमाळीचे लोक खऱ्या मनाने भगवान देवनारायणाची पूजा करतात, त्यामुळे या गावात पक्की घरे बांधली जात नाहीत, तथा पक्की घरं न बांधण्याचं वचन ग्रामस्थांनी देवनारायणांना दिले आहे. (Rajasthan Village)

Best Tourist Village
Best Tourism Villages: उत्तराखंडच्या 'या' 4 गावांना सर्वोत्तम पर्यटन गाव पुरस्कार; जाणून घ्या त्यांची खासियत

ही परंपरा वर्षानुवर्षे पाळली जात आहे. आजही गावात एकही पक्के घर नाही. या गावात छत असलेली मातीची घरे आहेत. गावात कोणीही मांसाहार करत नाही आणि मद्यपानही करत नाही.  गावातील सुमारे 3000 एकर जमीन भगवान देवनारायण यांना समर्पित असल्याचे सांगितले जाते, परंतु येथील कथा वेगळी आहे.

देवमाळी गावातील घरे
देवमाळी गावातील घरेesakal
Best Tourist Village
Rajasthan Tourism : राजस्थानात गेल्यावर वाटेल परदेशात आलो की काय? कारण ही ठिकाणं आहेत सेम-टू-सेम

गावातील रहिवासी वर्षानुवर्षे गावात वास्तव्यास असूनही त्यांच्याकडे जमिनीच्या मालकीचे कोणतेही कागदपत्र नाही. ग्रामस्थांसाठी गावाची जमीन भगवान देवनारायण यांच्या मालकीची आहे. त्यामुळे भक्तीभावाने लोक देवांवर सर्वकाही सोपवून त्या गावात राहतात.

Best Tourist Village
Dhule Monsoon Tourism: धुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांनी फुलली! धबधबे, किल्ल्यांचे पर्यटकांना आकर्षण

या गावचे पौराणिक महत्त्व काय आहे ?

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, अनेक वर्षांपूर्वी भगवान देवनारायण देवमाळी गावात आले तेव्हा त्यांनी स्थानिक समाजाकडून राहण्यासाठी जागा मागितली. समाजाने त्यांच्यासाठी मंदिर बांधले, परंतु स्वतःसाठी कधीही कायमस्वरूपी घर बांधण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळेच आजही घरांच्या बांधकामात काँक्रीट किंवा सळ्यांचा वापर केला जात नाही. गावात फक्त सरकारी इमारती आणि मंदिरे पक्की आहेत.  

या गावातील घरे वैशिष्ट्यपूर्ण आहेत
या गावातील घरे वैशिष्ट्यपूर्ण आहेतesakal
Best Tourist Village
Ziro Valley Tourism : भारतातल्या या ठिकाणाचं नावं आहे झिरो, जाणून घ्या का खास आहे हे शहर

सुरक्षेच्या कारणास्तव आपण सर्वजण आपल्या घरांना कुलूप लावतो, पण देवमाळी हे एक गाव आहे जिथे लोक कधीही घराला कुलूप लावत नाहीत. या गावात दरवर्षी पर्यटक येतात, त्यामुळे या गावाला कुलूप नसतानाही अनेक दशकांपासून येथे चोरी किंवा दरोड्याची एकही घटना घडलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.