Winter Travel Destination: डिसेंबर महिन्यात फिरण्यासाठी ही ठिकाणं परफेक्ट! लुटा सहलीचा मनसोक्त आनंद

आज आपण डिसेंबर महिन्यात सहलीसाठी बेस्ट ठरणारी काही ठिकाणं माहिती करून घेणार आहोत
Winter Travel Destination
Winter Travel Destinationesakal
Updated on

December Vacation Tour: डिसेंबर महिन्यात बऱ्याच सुट्ट्या तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे अनेक लोक डिसेंबरमध्ये त्यांच्या ट्रीप प्लान करत असणार. मात्र तुम्ही अजून ठिकाणं फायनल केली नसेल आज आपण डिसेंबर महिन्यात सहलीसाठी बेस्ट ठरणारी काही ठिकाणं माहिती करून घेणार आहोत.

Winter Travel Destination
मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

औली - औली हे उत्तराखंडमधील सगळ्यात सुंदर ठिकाण आहे. याला मिनी स्वित्जरलँड असेही म्हटले जाते. औलीमध्ये बघण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत. जर तुम्ही डिसेंबरमध्ये औली जाण्याचा प्लान करत असाल तर तुम्हाला या काळात इथे अनेक मजेदार अॅक्टिव्हिटी करायला मिळेल. डिसेंबरमध्ये बर्फानी आच्छादलेल्या पर्वतरांगा बघण्याची वेगळीच मजा असते.

गोवा - गोवा हे अनेकांचं ड्रिम डेस्टिनेशन असते. जर तुम्हाला थंडीचं वातावरण फार आवडत असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट ठरेल. गोव्यामध्ये क्रिसमस आणि न्यू ईयर धुमधडाक्यात साजरा केला जातो. यावेळी तुम्हाला इथे फेस्टिव्ह वाइब्स येतील.

रण आणि कच्छ - जर तुम्हा एखाद्या युनिक ठिकाणी जाण्याचा प्लान करत असाल तर रण आणि कच्छ तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरेल. येथे तुम्हाला चौफेर पांढरी बर्फानी आच्छादलेली जमिन बघायला मिळेल. दरवर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत येथे रण मोहोत्सव साजरा केला जातो. येथे तुम्हाला ऊंटाची सवारीही करायला मिळेल.

अलेप्पी - केरळची गणना डेस्टिनेशन ठिकाणांत केली जाते. येथे अलेप्पी बॅकवॉटर हाउसबोटसाठी फार फेमस आहे. हाउसबोटमध्ये एक रात्र घालवणं अनेकांचं स्वप्न असतं. अलेप्पी, तेकडी आणि मुन्नार या ठिकाणांना तुम्ही फिरायला जाऊ शकता.

मनाली - मनाली हे प्रत्येकाला माहिती असलेलं आणि विशलिस्टमध्ये असलेलं एक महत्वाचं ठिकाण आहे. ऑफ सीजनमध्ये येथे हजारोंच्या संख्येने लोक फिरायला येतात. उंच उंच पर्वतरांगा बघणं तुम्हाला फार आवडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.