Vajrai Waterfall : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! देशातील सर्वात उंच धबधबा आजपासून पर्यटनासाठी सज्ज

देशातील सर्वात उंच भांबवली वजराई धबधबा" आता पर्यटनासाठी सज्ज झाला आहे.
Bhambavli Vajrai Waterfall
Bhambavli Vajrai Waterfallesakal
Updated on
Summary

भांबवली वजराई धबधबा परिसर डोंगराळ असून घनदाट झाडी आहे, त्यामुळे पर्यटकांना चालायला कसरत करावी लागते.

कास : देशातील सर्वात उंच व 1 नंबरचा "भांबवली वजराई धबधबा" (Bhambavli Vajrai Waterfall) आता पर्यटनासाठी सज्ज झाला असून शनिवार आठ जुलैपासून यावर्षीच्या हंगामाची सुरुवात होत आहे.

Bhambavli Vajrai Waterfall
Rain Update : कोल्हापुरात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार; सात बंधारे पाण्याखाली, पंचगंगेच्या पाणीपातळीत 4 फुटांची वाढ

भांबवली वजराई धबधबा परिसर डोंगराळ असून घनदाट झाडी आहे, त्यामुळे पर्यटकांना चालायला कसरत करावी लागते. विशेष करून वयस्कर पर्यटकांची मागणी होती की, चालण्यासाठी सोईस्कर पायवाट व्हावी. या दृष्टीने वन खात्याने मनावर घेवून जांभ्या दगडाची पायवाट केली आहे.

त्यामुळे येथील पर्यटन सोयीस्कर होणार आहे. पर्यटकांना हिरव्यागर्द झाडीतील धुवांधार पावसाचा व धबधब्याचा थ्रिलींग अनुभव घ्यायचा असेल तर जुलै व ऑगस्ट महिन्यांत भांबवली वजराई धबधब्याला भेट दिली पाहिजे. भांबवलीतील आताचे वातावरण मनोरम आहे.

Bhambavli Vajrai Waterfall
Rain Update : 'जगबुडी'ने ओलांडली धोक्याची पातळी; महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, बंदररोड पाण्याखाली

धुवांधार पावसाच्या सरी, गार-गार वारा, रानकिड्यांचे आवाज, हिरवी गर्द झाडी, धबधब्याच्या पाण्याचा प्रचंड प्रपात, निसर्गाचा खुललेला नजारा पाहून मन प्रफुल्लित होते. भांबवली वजराई धबधब्याला ५ जानेवारी २०१८ रोजी "क" वर्ग पर्यटन म्हणुन मान्यता मिळाली. त्यानंतर धबधब्याच्या विकासाचे काम चालू झाले.

घनदाट जंगल व दुर्गम डोंगरातून जाताना पर्यटकांना कसरत करावी लागते व डोंगरातून घसगुंडी होत असे, ही कसरत पहिल्या टप्यातील पाय-या व रेलिंग केल्याने दूर झाली आहे. दुस-या टप्यात वाॅच टाॅवर व पॅगोडाचे काम झाले असून निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता येतो.

तिस-या टप्यातील बाम्बू (गेस्ट) हाऊसचे काम चालू असून लवकरच पूर्णत्वास जाईल व पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा आनंद मिळेल. पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्याची पर्वणी ठरणार हा मौसम आहे. निसर्गाचा अमूल्य ठेवा असलेला हा परिसर पर्यटन विकासामुळे खुलायला लागला असून, पर्यटकांना खुणावत आहे.

Bhambavli Vajrai Waterfall
Maharashtra NCP Crisis : ना कार्यकर्त्यांशी चर्चा, ना कोणता निर्णय.. अजितदादांना का पाठिंबा दिला? आमदार निकम करणार उलगडा

भांबवली हे अलीकडेच प्रसिध्दीस आलेले एक निसर्गसंपन्न पर्यटनस्थळ आहे. भांबवली वजराई धबधबा व भांबवली पठार ही येथील प्रमुख प्रेक्षणिय स्थळे आहेत. हा संपूर्ण परिसर दाट जंगल व विपूल निसर्ग संपदेने नटलेला आहे. आगामी काळात मंगळावरील अनुभवासारखा भास होणा-या भांबवली पठाराचा सुध्दा जागतिक पातळीवर लौकिक होईल व पूर्ण परिसाचा पर्यटन विकास होईल, अशी आशा स्थानिकांना लागून राहिली आहे.

धबधबा पाहण्यासाठी पन्नास रुपये शुल्क आकारले जाणार

भांबवली वजराई धबधबा व्यवस्थापन वनसमितीच्या माध्यमातून पाहिले जात असून धबधबा पाहण्यासाठी पन्नास रुपये प्रति व्यक्ती शुल्क आकारले जाणार आहे.

Bhambavli Vajrai Waterfall
Karnataka Budget : मराठ्यांसह लिंगायत, ख्रिश्चन, जैन, बौद्धांसाठी अर्थसंकल्पात बंपर अनुदान; शेतकऱ्यांनाही 5 लाख कर्ज

"पांढ-या शुभ्र पाण्याचा प्रपात म्हणजे जणूकाही धुधाळ धबधबा. निसर्गाचे काळ्याकुट्ट दगडावरील, हिरव्यागर्द झाडीतील धबधब्याचे विहंगम नजारा पाहायला निसर्गप्रेमी पर्यटकांच्या नजरा आसुसलेल्या असतात. आमदार शिवेंद्रराजे भोसले व वन खात्याचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्यातून भांबवली वजराई धबधबा हे एक प्रमुख व आकर्षक पर्यटन स्थळ होण्याच्या मार्गावर आहे. पर्यटकांनी या मौसमात भांबवलीला जरूर भेट द्यावी व निसर्गाचा मनमुराद आनंद लुटावा.

रविंद्र बळीराम मोरे, पर्यटन प्रमुख-भांबवली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.