चला कन्हान, कोलार व पेंच या त्रिवेणी नदीच्या संगमावर

चला कन्हान, कोलार व पेंच या त्रिवेणी नदीच्या संगमावर
Updated on

खापरखेडा (जि. नागपूर) : नागपूर शहराच्या झिरो माईलवरून अवघ्या २५ किमी अंतरावर बिना (संगम) हे गाव आहे. हे गाव महाराष्ट्रात भोसलेकालीन शिवमंदिर, तीर्थस्थळ व कन्हान कोलार पेंच या त्रिवेणी नद्यांचा संगमाने प्रसिद्ध झाले आहे. येथे अस्थिविसर्जनासाठी हजारो लोक येतात. बिना (संगम) जवळील वीजनिर्मिती केंद्र व कोळसा खाणीमुळे बिना (संगम)ची ओळख अधिक प्रचलित झाली.

कन्हान, कोलार आणि पेंच या तीन नद्यांच्या संगमावर असलेल्या या पर्यटनस्थळाला शासनाने २००७ मध्ये ‘क’ दर्जा दिला. प्राचीन भोसलेकालीन शिवमंदिर संगम काठावर आहे. मंदिरालगतच्या जागेचा लिलाव १९५९ मध्ये तेजसिंगराव भोसले यांनी केला. परंतु, त्यांनी मंदिराची जागा सोडली होती. भोसलेकालीन शिवमंदिर सव्वादोन एकर जमिनीवर आहे. बिना (संगम) येथे १९८१ पासून महाशिवरात्रीच्या यात्रेला सुरुवात झाली. दरवर्षी भाविकांची गर्दी होते. यात्रेच्या वेळी गावकऱ्यांकडून २५ हजारांवर भक्तांच्या जेवणाची सोय केली जाते.

चला कन्हान, कोलार व पेंच या त्रिवेणी नदीच्या संगमावर
‘तुझ्या पतीचा अपघात झाला, माझ्यासोबत लवकर चल’ अन्...

ज्वारीची भाकर अन् बेसनाचा झुणका

प्राचीन भोसलेकालीन शिवमंदिर व त्रिवेणी नदी संगम परिसरात विविध प्रकारचे दुकाने आहेत. मात्र, येथील झुणका भाकरीची दुकाने प्रसिद्ध आहेत. भाविकांसाठी येथील झुणका-भाकर आवडीची झाली आहे. अनेक जण येथे फक्त चविष्ट झुणका-भाकरीचा आस्वाद घेण्यासाठी येतात. ज्वारीची भाकर, बेसनाचा झुणका, हिरव्या मिरचीचा ठेचा व वांग्याचे भरीत कमी पैशात मिळते.

शिवलिंगाची विशेषता

त्रिवेणी नद्यांचा संगमकाठी असलेल्या प्राचीन भोसलेकालीन शिवमंदिरात दोन शिवलिंग आहेत. मोठा नंदी राजाचा तर लहान नंदी राणीचा अशी रास्त भाविकांची भावना आहे. महाशिवरात्री, ऋषीपंचमीला भाविकांची अलोट गर्दी येथे होत असते. भाविक दूरदूरहून येथे येतात. बिना संगमावर शैक्षणिक सहल, अस्थिविसर्जन, देवदर्शनासाठी भाविक येतात.

नैसर्गिक वातावरण

बिना संगम तीर्थक्षेत्रात दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटक येऊन नैसर्गिक वातावरणाचा लाभ घेतात. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची दुकाने लागलेली आहे. या माध्यमातून शेकडो स्थानिकांना रोजगार मिळाला आहे. बिना संगम तीर्थस्थळ व पर्यटनस्थळ स्थानिक बेरोजगार महिला व पुरुषांना रोजगाराच्या दृष्टीने उत्तम ठरले आहे.

चला कन्हान, कोलार व पेंच या त्रिवेणी नदीच्या संगमावर
शिवसेनेला धक्का! निवडणुकीच्या तोंडावर गजानन चिंचवडे भाजपमध्ये

वर्दळीमुळे प्रकाश झोतात

कन्हान, कोलार व पेंच या त्रिवेणी नदीच्या संगमावर शोकाकुल नागरिकांची गर्दी होते. नदीवर अस्थिविसर्जन करण्यात येते. ये-जा करणाऱ्या भाविकांची वर्दळ असल्याने निसर्गरम्य पर्यटन स्थळ प्रकाश झोतात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.