Bird Sanctuaries : पंछी बनू उडता फिरू; पक्षी प्रेमींसाठी पर्वणी ठरतायत हे बर्ड डेस्टीनेशन्स!

हिवाळ्यात या पक्षांची जत्राच भरलेली असते
Bird Sanctuaries
Bird Sanctuariesesakal
Updated on

संस्कृती, परंपरा सभ्यता याव्यतिरीक्त आपला देश निसर्ग सौंदर्य, ऐतिहासिक वारसा, हवामान यासाठीही ओळखला जातो. भारतातला साधेपणा अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक इथे गर्दी करत असतात. भारतात जसे प्राणिसंग्रहालय आहेत जिथे अनेक प्रकारचे प्राणी पाहता येतात. तसेच, भारतात काही प्रसिद्ध पक्षी संग्रहालयेही आहेत.

भारतातील अनेक अशी ठिकाणे आहेत ज्यांना पाहुन हाच काय तो स्वर्ग’ अशी फिलींग येते. हिमालय पर्वतापासून ते पश्चिम घाटातील जंगलांपर्यंत अनेक वैविध्यपूर्ण पक्ष्यांचे घर आहे. राजस्थान, केरळ, ओडिसा, कर्नाटक या राज्यातील हवामान एकमेकांपासून भिन्न आहे. तरीही येथे एकसारखेच पक्षी आढळतात हे वैशिष्ठ्यच म्हणावे लागेल.

भारतात येणाऱ्या परदेशी पाहुणे पक्षांचीही एक वेगळी ओळख आहे. दरवर्षी ते पक्षी भारतात येतात काही दिवस वास्तव्य करतात आणि निघून जातात. हिवाळ्यात या पक्षांची जत्राच भरलेली असते. अगदी आपल्या महाराष्ट्रातही अनेक वेगवेगळ्या परदेशी पक्षांची मांदियाळी असते. या पक्षांचे फोटो टिपणे आणि त्यांचे प्रदर्शन भरवणारेही अनेक हौशी कलाकार आहेत. त्यामूळे भारतातील प्रसिद्ध पक्षी अभयारण्यात गर्दी होत असते.

भरतपुर, राजस्थान

राजस्थानमधील भरतपुर पक्षी अभयारण्य ज्याला केवलादेव राष्ट्रीय उद्यान म्हणूनही ओळखले जाते. हे अभयारण्या राजस्थानमध्ये असून जगातील सर्वात सुंदर आणि परदेशी पक्षी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहण्याची संधी इथे मिळते. हे पाणथळ अभयारण्य भारतातील सर्वात महत्वाचे पक्षी स्थळांपैकी एक आहे. सायबेरियासारख्या दूरच्या स्थलांतरित पक्ष्यांसह 375 हून अधिक प्रजातींचे पक्षी असलेले हे ठिकाण पक्षीप्रेमींसाठी नंदनवन आहे.

Bird Sanctuaries
Tour Near Goa : गोव्याला जायचं प्लॅन करताय? त्याआधी वाटेतल्या या ठिकाणांना नक्की भेट द्या

चिल्का झील, ओडिसा

भारताच्या पूर्व किनार्‍यावर असलेले चिल्का सरोवर हे जगातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवरांपैकी एक आहे. पक्षी निरीक्षण करणाऱ्यांसाठी हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. येथे करकोचा, ग्रेटर फ्लेमिंगो आणि स्पॉट-बिल्ड पेलिकन सारख्या मोठ्या संख्येने जलपक्षी समाविष्ट आहेत.

Bird Sanctuaries
Tour to Amboli : थंड हवेच्या ठिकाणांची राणी! पर्यटनाला इथे जाल तर फक्त निसर्ग अन् तुम्ही एवढच दिसेल

 कुमारकोम पक्षी अभयारण्य, केरळ

केरळच्या बॅकवॉटरमध्ये वसलेले हे पक्षी अभयारण्य विविध प्रजातींसाठी लोकप्रिय आहे. वैविध्यपूर्ण पक्षी सहज उपलब्ध असल्याने ते प्रसिद्ध आहे. येथे आशियाई ओपनबिल, ग्रेट एग्रेट आणि लिटल कॉर्मोरंट या जातीचे पक्षी जास्त आढळतात.

Bird Sanctuaries
IRCTC Thailand Tour : अशी संधी पुन्हा येणे नाही; 50 हजारात फिरा थायलंड, बँकॉक, पटाया अन् बरंच काही!

रंगनाथिटु पक्षी अभयारण्य, कर्नाटक

कर्नाटकातील कावेरी नदीजवळ वसलेले असे एक अभयारण्य आहे. जे पक्षांच्या वसाहतीसाठी ओळखले जाते. राज्यातील हे अभयारण्यादेखील पक्षी निरीक्षणासाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. हे मूळ पक्षांची प्रजाती आणि इतर स्थलांतरित पक्ष्यांसाठी ओळखले जाते. यात ज्यात स्पॉट-बिल पेलिकन, पेंट केलेले स्टॉर्क आणि आशियाई ओपनबिल यांचा समावेश आहे.

Bird Sanctuaries
Goa Tour Plan: गोव्यात या गोष्टी फुकटात असताना तूम्ही परदेशात कशाला जाताय?

बिनसार वन्यजीव अभयारण्य

बिनसार वन्यजीव अभयारण्य हे उत्तर भारतातील उत्तराखंड राज्यात आहे. हे ठिकाण हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे आणि हिमालयीन मोनाल, कालीज तीतर आणि स्पॉटेड फोर्कटेल यांसारख्या प्रजातींसह विविध पक्षीजीवनासाठी ओळखले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.