Travel Career : ट्रॅव्हल अँड टुरिझम क्षेत्रात उत्तम संधी; जाणून घ्या, आवश्यक स्किल्स अन् अभ्यासक्रम

कोविड-19 च्या महामारीमुळे जग लॉकडाऊनमध्ये असताना ट्रॅव्हल अँड टुरिझम उद्योगाला मोठा फटका
Travel Career : ट्रॅव्हल अँड टुरिझम क्षेत्रात उत्तम संधी; जाणून घ्या, आवश्यक स्किल्स अन् अभ्यासक्रम
Updated on

फिरण्याची आवड कोणाला नसते. सगळ्यांच फिरायला खूप आवडतं त्यातले काही लोकं याचे शौकीन असतात. आपल्याकडे दिवाळीच्या सुट्टीत, उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेक कॅम्प होतात ज्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच ट्रेकिंग आणि हायकिंग साठीच्या अँडवान्स पद्धती शिकवल्या जातात.

Travel Career : ट्रॅव्हल अँड टुरिझम क्षेत्रात उत्तम संधी; जाणून घ्या, आवश्यक स्किल्स अन् अभ्यासक्रम
Knowledge For Students: विद्यार्थ्यांसाठी Career Guidance का महत्वाचे?

मौज म्हणून, डेली रूटिनमध्ये ब्रेक म्हणून फिरायला जाणे, ट्रेक्स करणे हे तर झालंच पण याच क्षेत्रात करियर करता येत असेल तर?आपल्या आवडत्या जागी फिरण्यासाठी कोणीतरी पैसे देतय ही ऐकायलाच की भन्नाट कल्पना वाटते आहे. आता अशा अनेक संधी उपलब्ध आहेत ज्यातून तुम्ही याला आपल फुल अर्निंग करीअर बनवू शकतात.

Travel Career : ट्रॅव्हल अँड टुरिझम क्षेत्रात उत्तम संधी; जाणून घ्या, आवश्यक स्किल्स अन् अभ्यासक्रम
How to Choose a Career: करिअर निवडण्याआधी या टिप्स करा फॉलो; नाहीतर होईल पश्चाताप

कोविड-19 च्या महामारीमुळे जग लॉकडाऊनमध्ये असताना ट्रॅव्हल अँड टुरिझम उद्योगाला मोठा फटका बसला होता. याचा परिणाम म्हणून सर्व विकसनशील आणि विकसित देशांच्या आर्थिक विकासात घसरण झाली. असे अनेक देश आहेत जे आपल्या डेव्हलमेंट साठी ट्रॅव्हल अँड टुरिझमवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत.

Travel Career : ट्रॅव्हल अँड टुरिझम क्षेत्रात उत्तम संधी; जाणून घ्या, आवश्यक स्किल्स अन् अभ्यासक्रम
Career : व्हिडिओ जॉकी कमी वेळात पैसा, नाव आणि प्रसिद्धी मिळवून देणारं क्षेत्र

पर्यटनाला चालना देण्यासाठी त्यात मोठी गुंतवणूकही केली जात आहे. अशा परिस्थितीत येत्या काळात या क्षेत्रात नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होणार आहेत.यासाठी तुम्ही ट्रॅव्हल एजन्सी, सरकारी पर्यटन विभाग, हॉटेल, टूर ऑपरेशन, इमिग्रेशन आणि कस्टम सर्व्हिसेस इत्यादींसाठी काम करू शकतात.

Travel Career : ट्रॅव्हल अँड टुरिझम क्षेत्रात उत्तम संधी; जाणून घ्या, आवश्यक स्किल्स अन् अभ्यासक्रम
Career tips : करिअर निवडीबाबतचा संभ्रम असा करा दूर; लवकरच व्हाल यशस्वी

प्रोफेशनल कोर्सेस सोडून हे देखील आहे आवश्यक

ट्रॅव्हल अँड टुरिझममधील डिगरी किंवा डिप्लोमा तर तुम्ही घेऊच शकतात पण त्याच बरोबरीने तुम्ही काही सर्टिफिकेट कोर्स देखील करू शकतात. शिवाय संशोधन क्षेत्रात करिअर करण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडत्या विषयात पीएचडीही करू शकतात. ही पीएचडी तुम्ही कोणत्याही खाजगी किंवा सरकारी संस्थेतून करू शकता. त्यासाठी त्या संस्थेची प्रवेश परीक्षा पास करणे गरजेचं आहे.

Travel Career : ट्रॅव्हल अँड टुरिझम क्षेत्रात उत्तम संधी; जाणून घ्या, आवश्यक स्किल्स अन् अभ्यासक्रम
Career in Anaesthesia: करियरच्या उत्तम संधी शोधताय? वाचा हे कोर्सेस

याशिवाय, ट्रॅव्हल आणि टुरिझम इंडस्ट्रीमध्ये करिअर करण्यासाठी हे प्रोफेशनल कोर्सेस सोबत चांगले संवाद कौशल्य, नेतृत्व करण्याची तयारी, टाईम मॅनेजमेंट आणि आत्मविश्वास असणे गरजेचं आहे.

Travel Career : ट्रॅव्हल अँड टुरिझम क्षेत्रात उत्तम संधी; जाणून घ्या, आवश्यक स्किल्स अन् अभ्यासक्रम
Career : योग्य करिअर निवडीसाठी बुद्धिमापन चाचणी आवश्यक

अशा काही युनिव्हर्सिटी जिथे तुम्हाला हा कोर्स शिकता येईल.

1. बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, वाराणसी

2. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, नवी दिल्ली

3. क्राइस्ट युनिव्हर्सिटी, बँगलोर

4. एमिटी इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॅव्हल अँड टुरिझम, नोएडा

5. जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली

6. लखनऊ युनिव्हर्सिटी, लखनऊ

Travel Career : ट्रॅव्हल अँड टुरिझम क्षेत्रात उत्तम संधी; जाणून घ्या, आवश्यक स्किल्स अन् अभ्यासक्रम
Career : फॉरेस्ट्री आहे करिअरचा निसर्गरम्य पर्याय

पगार :

कँडीडेट ट्रॅव्हल एजंट, ट्रॅव्हल एक्झिक्युटिव्ह, ट्रॅव्हल ऑफिसर, टूरिस्ट गाईड, ट्रान्सपोर्ट ऑफिसर, ट्रॅव्हल रायटर, ग्राउंड स्टाफ, ट्रॅव्हल कौन्सिलर आणि ट्रान्सलेटर म्हणून काम करू शकतात. नोकरीच्या सुरुवातीस, तुम्हाला दरमहा 15-20 हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. मात्र, काही वर्षांच्या अनुभवानंतर तुम्हाला चांगला पगार सहज मिळू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.