आपल्या देशात पर्यटन क्षेत्राशी संबंधित उद्योग-रोजगाराच्या संधी वाढत असल्याचं दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे केंद्र आणि राज्य सरकार देखील पर्यटन क्षेत्राला चालना देत आहेत. अशातच तरुणाई देखील टुरिस्ट गाईड म्हणून करिअर करण्यासाठी या क्षेत्राची मोठ्या प्रमाणात निवड करताना दिसताहेत.
तुम्हाला देखील वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याची आवड आहे आणि विशेष म्हणजे संवाद कौशल्याच्या बळावर आपण अनोळखी लोकांमध्ये सहज मिसळून जाता, तर मग आपण या क्षेत्रामध्ये आपले स्थान निर्माण करू शकता. पर्यटन क्षेत्र आपल्यासाठी करिअरचा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.
टुरिस्ट गाईड आपल्या अनुभव आणि ज्ञानाच्या आधारे पर्यटकांना ऐतिहासिक स्थळे, धार्मिक स्थळे, संग्रहालये, राष्ट्रीय उद्याने किंवा सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या ठिकाणी मदत तसंच माहिती सांगण्याचे काम करत असतात.
हे काम हटके असून या क्षेत्रात रोजगाराच्या संधी देखील खूप आहेत. तुम्हालाही टुर गाईड म्हणून करिअर करण्याची इच्छा आहे का? यासाठी कोणता कोर्स करावा? या क्षेत्रात करिअर केल्यास किती पगार मिळेल? यासंबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊया.
काही तरी हटके करण्याचा विचार असलेले तरुण मंडळी पर्यटन क्षेत्राची निवड करू शकतात. पण या क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी आपणास काही गोष्टींवर काम करावे लागेल. यासाठी तुम्हाला इंग्रजी आणि एखादी परदेशी भाषा शिकावी लागेल.
संवाद कौशल्यासह प्रवास आणि वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती असणे आवश्यक आहे. करिअरमध्ये चांगली प्रगती व्हावी, यासाठी इतिहास आणि संस्कृतीचे ज्ञान असणंही आवश्यक आहे. टुरिस्ट गाईड म्हणून कोणतीही गोष्ट पर्यटकांना वेगळ्या पद्धतीने सांगण्याची कलाही शिकून घेणे गरजेचं आहे.
तुम्हाला याच क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असेल तर स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भाषांचे ज्ञान असणे गरजेचं आहे. कारण यामुळे आपणास परदेशातही रोजगाराच्या चांगल्या संधी मिळू शकतील.
टुरिस्ट गाईड म्हणून करिअर करण्यासाठी शैक्षणिक पात्रता तुम्ही निवडलेल्या पर्यायावर अवलंबून असते. काही ठिकाणी इयत्ता बारावी किंवा पदवीधर/ ग्रॅज्युएशन पदवी आवश्यक असते.
काही कंपन्यांमध्ये उमेदवारांची निवड टुरिझम विषयातील डिग्री, डिप्लोमा किंवा सर्टिफिकेशननुसार केली जाते. इयत्ता बारावीची परीक्षा पास केल्यानंतर आपण टुरिझम विषयातील कोर्स करू शकता.
या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर तीन प्रकारचे कोर्सेस आहेत. फुल टाइम कोर्सव्यतिरिक्त शॉर्ट टर्म कोर्सचा पर्याय देखील उलपब्ध आहे. बॅचलर कोर्स तीन वर्षांसाठी तर पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सचा कालावधी दोन वर्षे इतका आहे. काही इंस्टिट्युमध्ये सर्टिफिकेट आणि डिप्लोमा कोर्स देखील उपलब्ध आहेत.
बॅचलर ऑफ टुरिझम अॅडमिनिस्ट्रेशन
बॅचलर ऑफ टुरिझम स्टडीज
मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन इन टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट
एमए इन टुरिझम मॅनेजमेंट
डिप्लोमा इन ट्रॅव्हल मॅनेजमेंट अँड एअरपोर्ट मॅनेजमेंट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.