Chandoli : परिसरातील धबधबे ठरताहेत पर्यटकांसाठी पर्वणी, पर्यटनासाठी रीघ

गुढे पाचगणी पठारावरून दिसणारा निसर्ग अप्रतिम भासत आहे.
chandoli rainforest waterfall
chandoli rainforest waterfall
Updated on

कोकरूड : शिराळा तालुक्यातील पश्चिम भागात निसर्गाची मुक्तपणे उधळण सुरु असून चांदोली धरण परिसरात एक दिवसीय पर्यटनाला पर्यटक गर्दी करू लागले आहेत. सध्या या भागात श्रावण सरी बरसत असून पावसाळी पर्यटनाला उधाण आले आहे. श्रावण महिन्यात हा निसर्ग नजराणा अधिकच खुलून दिसत आहे.

तालुक्यातील विविध ठिकाणांचे पांढरेशुभ्र धबधबे केंद्रबिंदू ठरत असून चांदोली धरण, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, मिनी महाबळेश्वर असलेले गुढे पाचगणी पठार, डोंगररांगेतून खळखळत वाहणाऱ्या जलधारा, सभोवतालची गर्द हिरवी झाडी, पक्षांचा किलबिलाट पर्यटकांना आकर्षित करत आहेत.

chandoli rainforest waterfall
Konkan Rain : अर्जुना-कोदवली नद्यांना पूर; राजापूरला पुराचा वेढा, जनजीवन विस्कळीत

पावसाळी पर्यटनासाठी निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या व ग्रामीण भागातील निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी पर्यटक या भागात भटकंती करताना दिसत आहेत. गुढे पाचगणी पठारावरून दिसणारा निसर्ग अप्रतिम भासत आहे. ठिकठिकाणी डोंगरावर आलेली रंगीबेरंगी विविध जातीची आकर्षक फुले, हिरवीगार भातशेती, मंद वाहणारा वारा,डोंगर माथ्यावर घोंगावत असलेल्या पवनचक्क्या, हे सारं सृष्टीच सौंदर्य पाहून पर्यटक सुखावत आहेत.

रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे परिसरातील हिरवीगार वनराई भहरली असून,डोंगर रांगामधुन पसरलेले विस्तीर्ण पठार, हिरव्यागर्द डोंगर कपारीतून झुळझुळ वाहणारे छोटे.मोठे धबधबे पर्यटकांना खुणावत आहेत. श्रावण महिन्यातील ऊन-पावसाच्या खेळामध्ये सृष्टीच हे लावण्य पाहणाऱ्या प्रत्येकाला हा परिसर भुरळ घालत असून चोहीकडे नजर फिरेल तिकडे हिरवाईने नटलेली विलोभनीय दृश्य पाहताना या परिसरातील हिरव्यागार सृष्टीच सौंदर्य आणखीनच खुलून दिसत आहे.

chandoli rainforest waterfall
Travel : पिकनिकची तयारी करताय?, नवी मुंबईतील 'या' 7 बेस्ट स्थळांना नक्की भेट द्या

गुढे पाचगणी पटावरती जाताना रांजणवाडी, सावंतवाडी, भाष्टे वाडी, येसलेवाडी येथील घाटातून प्रवास करताना असलेली नागमोडी वळणे व या घाटाला लाभलेले निसर्ग संपन्न वैभव, चोहोबाजूंनी दिसणारी हिरवीगार दृश्य सर्वांनाच भुरळ पाडत आहेत. निसर्गाचा हा अद्भुत नजराना पाहताना आजूबाजूचा निसर्ग पर्यटकांना आकर्षित करून घेत आहे. सृष्टीच हे लावण्य श्रावणात बहरल असून निसर्गाचं हे सौंदर्य डोळे भरून पाण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत.

'१०' की.मी. अंतरावर '६' धबधबे

उखळू येथील २०० फुटावरून कोसळणारा आगरकडा धबधबा, मणदूर येथी शेवताई धबधबा, सोनवडे येथील मरगोबाचा धबधबा, शित्तुर येथील आगर कढा व मांडव धबधबा, उदगीरी येथील कानसा धबधबा हे चांदोली परिसरातील १० की.मी. अंतरावरील ६ कोसळणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करत आहेत.

chandoli rainforest waterfall
Mahatma Gandhi : इतिहास 8 ऑगस्टचा; महात्मा गांधीजींच्या चळवळीने ब्रिटीश राजसत्ता हादरली होती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.