Cheapest Destination: फक्त पाच हजाराच्या बजेटमध्ये एक्सप्लोअर करा भारतातली ही ठिकाणं, एकदा पहाल तर हरवून जाल!

स्वस्त असली तरी लोकेशन्स आहेत एकापेक्षा एक
Cheapest Destination:
Cheapest Destination:esakal
Updated on

India Tourism :

नवीन वर्षाच्या स्वागताला सहलीचे नियोजन सुरू झाले आहे. नवीन वर्षात पर्यटक अनेक सुंदर ठिकाणी पोहोचतात आणि मजा करतात. तुम्हालाही 2024 ची सुरुवात एखाद्या सुंदर ठिकाणाहून करायची असेल. पण तुमचे बजेट त्याला परवानगी देत नसेल, तर काळजी करू नका.

आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. जिथल्या बर्फाळ दऱ्या अप्रतिम सुंदर आहेत. जिथे तुम्ही वाईल्ड लाईफ सेंच्युरीची सफरसुद्धा करू शकता. तेही केवळ पाच हजार रूपयात.

ही ठिकाणी हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड इथली आहेत. त्यामुळे तुम्ही दिल्लीतून सहजच इथे पाच हजारात पोहचू शकता. तिथले निसर्ग सौंदर्य पाहू शकता. आणि नव्या वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात अगदी शांत वातावरणात करू शकता.

Cheapest Destination:
Thailand Tour : निवांत वेळ घालवण्यासाठी थायलंडला जायला लागतंय; जाणून घ्या खर्च, अन् काय काय पहाल

कसोल, हिमाचल प्रदेश

जर तुम्हाला निसर्गावर प्रेम असेल तर हिमाचल प्रदेश पेक्षा सुंदर जागा असूच शकत नाही. कसोल हे हिवाळ्यात भेट देण्यासाठी योग्य ठिकाण आहे. कसोलला जाऊन तुम्ही पार्वती व्हॅलीचा आनंद घेऊ शकता. कसोल ते कुल्लू हे अंतर फक्त 40 किमी आहे. तुम्ही दिल्लीहून कसोलला व्होल्वो बसने जाऊ शकता, ज्याचे भाडे केवळ 1,000 रुपये आहे. तिथे गेल्यावर तुम्ही ५०० रुपयांत हॉटेल रूम बुक करू शकता आणि कमी बजेटमध्ये जेवणही उपलब्ध आहे.

Cheapest Destination:
India Tour of West Indies : कसोटी मालिकेत 'या' 4 खेळाडूंवर दबाव, फ्लॉप झाल्यास BCCI देणार नारळ
कसोल, हिमाचल प्रदेश
कसोल, हिमाचल प्रदेशesakal

मॅक्लॉडगंज, हिमाचल प्रदेश

कासोल व्यतिरिक्त, मॅक्लॉडगंज हे हिमाचलमधील एक अतिशय सुंदर आणि अद्भुत ठिकाण आहे. धर्मशाळेजवळ असलेले हे ठिकाण एक हिल स्टेशन आहे. जे ट्रेकर्सना खूप आवडते. येथील तिबेटी संस्कृती खरोखरच अप्रतिम आहे. भारतातील सर्वात प्रसिद्ध नामग्याल मठ आणि त्सुगलाखांग येथे आहेत. हे ठिकाण खूपच स्वस्त आहे.

Cheapest Destination:
IRCTC Thailand Tour Package: थायलंडमध्ये साजरं करा नवीन वर्ष, चक्क इंडियन रेल्वेने लाँच केलं खास टूर पॅकेज

लॅन्सडाउन, उत्तराखंड

लॅन्सडाउन हे उत्तराखंडच्या गढवाल टेकड्यांवर वसलेले आहे, जे पर्यटन प्रेमींसाठी सर्वात आवडते ठिकाण आहे. तुम्ही खिशात पैसे देऊन या ठिकाणाला भेट देऊ शकता. गर्दीपासून दूर पर्वतांच्या शांतता आणि सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी हे ठिकाण योग्य असू शकते. या ठिकाणी चांगल्या हॉटेलमध्ये रुम 700-800 रुपयांना मिळतात.

Cheapest Destination:
Foreign Tour Plan: हॅपी वेकेशन्ससाठी एक्सप्लोर करा व्हिसा नकारन्याचे प्रमाण कमी असलेले हे देश ...

पचमढी, मध्य प्रदेश

पचमढी हे होशंगाबाद जिल्ह्यातील एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. पाच हजार रुपयांमध्ये तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता. बायोस्फीअर रिझर्व्हचा एक भाग असलेल्या पचमढीमध्ये आल्यावर तुम्ही केवळ धबधबे, निसर्ग, गुहा, जंगलांना भेट देऊ शकत नाही तर अनेक ऐतिहासिक वास्तूही पाहू शकता. येथे तुम्हाला ५०० रुपयांमध्ये हॉटेल रूम आणि स्वस्त जेवण मिळू शकते. तुम्ही भाड्याने जिप्सी घेतल्यास, तुम्हाला ती 1,200 रुपयांपर्यंत मिळेल.

Cheapest Destination:
IND Squad For SA Tour : वर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाने बदलला कर्णधार? 'या' खेळाडूकडे दिली संघाची धुरा

तवांग, अरुणाचल प्रदेश

तुमचे बजेट 5,000 रुपयांपर्यंत असेल तर तुम्ही अरुणाचल प्रदेशातील तवांगला जाऊ शकता. दलाई लामा यांचा जन्म येथे झाला. येथे अनेक सुंदर मठ आहेत. अध्यात्माशी निगडित असण्यासोबतच हे निसर्गसौंदर्याच्या कुशीत वसलेले एक पर्यटन स्थळ आहे.

येथील सुंदर ऑर्किड आणि टिपी अभयारण्य अतिशय सुंदर आहे. तुम्ही दिल्लीहून ट्रेनने इथे येऊ शकता आणि स्वस्त हॉटेल्स मिळू शकतात. इथे जेवणही अगदी कमी बजेटमध्ये मिळते.

तवांग, अरुणाचल प्रदेश
तवांग, अरुणाचल प्रदेश esakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.