हिवाळ्यात सर्वत्र नवं चैतन्य पसरलेलं असतं. सर्वत्र गुलाबी थंडी पडलेली असते. अशा वातावरणात जोडीदाराचा हात हातात घेऊन प्रेमाची गाणी गुणगुणत निसर्गातून विहार करणं प्रत्येकालाच आवडतं. तुम्ही सोशल मिडियावर चेरी ब्लॉसम फेस्टीव्हलबद्दल ऐकलं असेल.
चेरी ब्लॉसम फेस्टीव्हल हा चीन,जपान देशात साजरा केला जातो. तिकडे या ऋतूमध्ये गुलाबी रंगाची फुले उमलतात. या फुलांच्या सानिध्यात तिथले लोक एक दिवस घालवतात. तिकडे या फेस्टीव्हलला गर्दी होते.