Datta Jayanti 2022 : बाबा बुदानगिरी पर्वतावरील दत्त पीठ आहे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक!

दत्त जयंतीला येथे तीन दिवसाचा मोठा उत्सव असतो
Baba Budangiri Datta Pith
Baba Budangiri Datta Pith esakal
Updated on

बाबा बुदनगिरी हा पश्चिम घाटात वसलेला चिकमंगळूर येथे एक सुंदर पर्वत आहे. या टेकडीला दत्तात्रेय पीठ म्हणूनही ओळखले जाते, असे मानले जाते की दत्तात्रेयांनी आपल्या जीवनाचा काही काळ येथे असलेल्या गुहेत घालवला होता. येथे दत्त जयंती देखील साजरी केली जाते. ज्यामध्ये सहभागी होण्यासाठी भक्त लांबून येतात. या हिल स्टेशनला नैसर्गिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या टेकडीवर सुफी संत बाबा बुदान यांचाही सहवास होता.

अरब देशातून इस्लामचा संदेश देत भारतात आलेल्या बाबा बुदान यांनी या टेकडीवर वास्तव्य केले. तर दुसरीकडे दत्त महाराजांनीही इथे काही काळ तपश्चर्या केली आहे. त्यामूळे दत्त जयंतीला येथे तीन दिवसाचा मोठा उत्सव असतो. मुस्लिम बांधवांचीही येथे गर्दी असते.

कॉफी भारतात कशी आली

एकेकाळी भारतात केवळ चहाच पिला जात होता. पण, धर्म प्रसारासाठी देशाटन करणारे संत बाबा बुदान यांनी भारतात प्रथम कॉफीच्या झाडे लावली. त्या पर्वत रांगांमध्ये फिरताना त्यांनी स्वत:कडील ७ कॉफीच्या बिया पर्वतावर फेकल्या. त्यातून कॉफीची झाडे उगवत गेली, असे सांगितले जाते. या पर्वतरागांमध्ये सुफी संत हजरत दादा हयात खालंदर यांचा दर्गाही आहे. त्यामूळे इथे मुस्लिम लोकांसोबत हिंदूं लोकही येतात.

बाबा बुदनगिरी हे समुद्रसपाटीपासून सुमारे 1895 मीटर उंचीवर वसलेले आहे. या पर्वतरांगा दूरवरून निसर्गप्रेमी, ट्रेकर्सना आकर्षित करतात. या पर्वातांमध्ये कुरिंजी हे फुल सापडते. येथे आढळणारे अनोखे डोंगरी फूल असून ते 12 वर्षातून एकदा उमलतात. हे विलोभनीय दृश्य शेवटच्या वेळी 2018 मध्ये घडले होते. पुढच्या वेळी ही फुले 2030 मध्ये उमलतील.

Baba Budangiri Datta Pith
Pune News : 'खोटं बोलायचं नाही' असं शिकवणारे शिक्षकच देतायेत एकशेएक कारणं

बुदान पर्वतरांगांवरील धबधबे

झरी धबधबा

चिकमंगळूरचा प्रसिद्ध झरी धबधबा याच पर्वतावर आहे. ज्याला "बटरमिल्क फॉल्स" असेही म्हणतात. बुदनगिरीपासून 12 किमी अंतरावर अट्टीगुंडीजवळ हा धबधबा आहे. या धबधब्याच्या आजूबाजूला कॉफीचे मळेही आहेत.

माणिक्य धारा धबधबा

माणिक्य धारा धबधबा बाबा बुदन गिरी हिल्सच्या परिसरात आहे. पर्यटकांना आपल्या कुटुंबासह येथे यायला आणि निसर्गाच्या या सुंदर वारशामध्ये वेळ घालवायला आवडते. ट्रेकिंग, घनदाट जंगल असलेल्या या डोंगरांवर असलेली हिरवळ आणि थंड वातावरण पर्यटकांना या ठिकाणी आकर्षित करते.

Baba Budangiri Datta Pith
Datta Jayanti 2022 : जेव्हा इब्राहिम अली या भक्ताला दत्तगुरूंनी राजा होण्याचा वर दिला…!

बाबा बुदान टेकडी परिसरात तीन महत्त्वाचे धबधबे आहेत. त्यापैकी काही पौराणिक कथांनुसार, गड तीर्थ हे पाच पांडवांपैकी एकाने बांधले होते. वनवासात मातेची तहान शमवण्यासाठी गदाधारी भीमाने येथून पाणी घेतले. सप्टेंबर ते मार्च हा काळ या पर्वतरांगांमध्ये जाण्यासाठी परफेक्ट काळ आहे.

Baba Budangiri Datta Pith
Armed Forces Flag Day 2022 : सशस्त्र सेना दिवसाविषयी १० मोठ्या गोष्टी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.