Destination Wedding : लग्न लक्षात राहिलं पाहिजे; डेस्टीनेशन वेडींगसाठी रोमॅन्टीक लोकेशन एकदा पाहुन घ्या!

उदयपूर हे अनेक हॉलिवूड आणि बॉलीवूड सेलेब्सचे फेव्हरेट वेडिंग डेस्टिनेशन देखील आहे
Destination Wedding
Destination Weddingesakal
Updated on

लग्नाविषयी लोकांची अनेक स्वप्ने असतात. त्यामूळे लग्न मोठ्या पद्धतीने करण्याचा प्लॅन हमखास आखला जातो. पूर्वी दारात लग्न व्हायची. त्यानंतर ती मोठ्या कार्यालयात पार पडू लागली. पण, आता डेस्टिनेशन वेडींगची चलती आहे. त्यामूळे लग्न कुठे पार पडणार याची सर्वांनाच उत्सुकता असते.  

Destination Wedding
Travel Tips : "व्हिजा मिळवून देणारे देव" परदेशी जाणारे लोक या मंदिरात करतात नवस

पूर्वीच्या काळात लग्न समारंभात नवरा-नवरीचे सर्व नातेवाईक एकत्र येऊन लग्नाची मजा लुटायचे. पण, कालांतराने ते बंद झालं. आता कोणाला एवढा वेळ असतो लग्नासाठी. त्यामूळे लग्नादिवशी हजेरी लावायची अन् अक्षता टाकून निघून जायचं एवढंच सर्वत्र होतं असतं. पण, या डेस्टीनेशन वेडींग थीममूळे पुन्हा एकदा लोक लग्न एन्जॉय करू लागले आहेत.  

Destination Wedding
IRCTC Thailand Tour : अशी संधी पुन्हा येणे नाही; 50 हजारात फिरा थायलंड, बँकॉक, पटाया अन् बरंच काही!

वर-वधूची प्रत्येक गोष्ट खास असते. लग्नाचा ड्रेसकोड, जेवणाचा मेन्यू त्यांची एन्ट्री याची बारकाईने काळजी घेतली जाते. त्याचबरोबर ड्रीम डेस्टिनेशन वेडिंगही बहुतांश लोकांना हवं असते. तूम्हालाही तूमचे लग्न लोकांच्या आठवणीत राहिल असे करायचे असेल तर काही लोकेशन्स पाहुन ती आजच बुक करा.

Destination Wedding
Burqa Fashion: अबब! एक बुरखा पण त्यातही असतात एवढ्या स्टाईल...

शाही वेडींग - जोधपूर

शाही स्टाईलमध्ये लग्नाच्या आठवणी रहाव्यात यासाठी राजस्थानमधील जोधपूरमध्ये लग्नाचे प्लॅनिंग करणे चांगले कधीही चांगले. जोधपूरमधील मेहरगड किल्ला हा देशातील बेस्ट शाही वेडींग डेस्टीनेशन मानला जातो. अशा तऱ्हेने लग्न संस्मरणीय करण्यासाठी जोधपूरची निवड करणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

Destination Wedding
Wedding Fashion Tips : ‘दुल्हन का लेहंगा सुहाना लगता है’ ; या टिप्सने ब्रायडल लेहंग्याला द्या पर्सनल टच!

बर्फाळ प्रदेशातील संस्मरणीय लग्न - शिमला

हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलाला पर्वतांची राणी म्हटले जाते. तसं पाहिलं तर शिमल्याचं नाव देशातील प्रसिद्ध ट्रॅव्हल स्पोर्ट्समध्ये आहे. पण बर्फाळ प्रदेशात लग्न करण्यासाठीही शिमल्याची निवडणूक परफेक्ट ठरू शकते. त्याचबरोबर शिमल्यात डेस्टिनेशन वेडिंगसाठी अनेक आलिशान मॅरेज हॉल,लॉन आहेत.

Destination Wedding
Sidharth Kiara Wedding: विकी-कतरिनाप्रमाणे कियारा-सिडनेही लग्नाआधी घेतला 'हा' मोठा निर्णय

वाळवंटातील लग्न -उदयपूर

ड्रीम डेस्टिनेशन वेडिंगचा उल्लेख होताच उदयपूर बहुतेकांच्या मनात प्रथम येतो. तलावांचे शहर म्हणून ओळखले जाणारे उदयपूर पूर्वेचे व्हेनिस मानले जाते. ज्यामुळे उदयपूर हे अनेक हॉलिवूड आणि बॉलीवूड सेलेब्सचे फेव्हरेट वेडिंग डेस्टिनेशन देखील आहे.

Destination Wedding
SAKAL Exclusive : आदिवासी भागातील सौंदर्यस्थळे ठरतायेत ‘Pre-Wedding Destination'

प्रेमाचे प्रतिक असलेला ताजमहाल

जगातील सातवे आश्चर्य असलेल्या ताजमहालसाठी आग्रा प्रसिद्ध आहे. तो प्रेमाचे प्रतिकही मानला जातो. याच ताजला डोळ्यासमोर ठेऊन एकमेकांसोबत साथ फेरे घेणे तूम्हाला एक वेगळा अनुभव देऊ शकतात. त्यामूळे ड्रीम डेस्टिनेशन वेडिंग प्लॅन करण्यासाठी तुम्ही आग्राची निवड ही करू शकता.

Destination Wedding
Goa Tour Plan: गोव्यात या गोष्टी फुकटात असताना तूम्ही परदेशात कशाला जाताय?

समुद्र किनारा - गोवा

गोजर मुहूर्तावर मावळत्या सुर्याला साक्षी मानून एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालायच्या असतील तर एखाद्या समुद्र किनारी लग्न करणे कधीही चांगले. त्यातही स्वस्तात लग्न करायचे असेल तर गोवा हा बेस्ट पर्याय आहे. गोव्यात गेल्यावर तूम्ही समुद्रकिनारी प्री-वेडिंग फोटोशूट करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.