Devgad Tourist Places
Devgad Tourist Placesesakal

Devgad Tourism : सलग सुट्यांमुळे गजबजणार देवगडातील पर्यटन स्थळे; किनारी भागात वाढणार रेलचेल

सलग सुट्यांमुळे तालुक्यातील विविध पर्यटनस्थळे (Devgad Tourist Places) पर्यटकांनी (Tourists) गजबजण्याची शक्यता आहे.
Published on
Summary

सध्या माध्यमिक शाळा सुरू झाल्या असल्या तरी अजून महाविद्यालये सुरू झालेली दिसत नाहीत.

देवगड : सलग सुट्यांमुळे पुन्हा एकदा तालुक्यातील विविध पर्यटनस्थळे (Devgad Tourist Places) पर्यटकांनी (Tourists) गजबजण्याची शक्यता आहे. आज (ता. २५) शनिवारपासून पुन्हा तीन दिवस शासकीय कार्यालयांना सुटी असल्याने किनारी भागातील पर्यटन बहरण्याची शक्यता दिसते.

समुद्र आणि कोकण याची पर्यटकांना नेहमीच भुरळ असते. दीपावलीच्या आणि उन्हाळी सुट्टीत पर्यटकांचा किनारी भागाकडे अधिकचा ओढा असतो. या काळात पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजलेली असतात. तालुक्यातील किल्ले विजयदुर्ग, श्री क्षेत्र कुणकेश्वर, तांबळडेग तसेच देवगड समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी जाणवते‌.

Devgad Tourist Places
Government Holidays 2024 : नव्या वर्षात मिळणार 'इतक्या' शासकीय सुट्या; सरकारकडून सुट्यांचं कॅलेंडर जाहीर

साधारणपणे दिवाळी दरम्यान मासळी हंगाम तेजीत असतो. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांची मासळी जेवणाला अधिक पसंती असते. मागील आठवड्यात येथील हॉटेल तसेच निवास न्याहारी ठिकाणी पर्यटकांची वर्दळ होती. त्यामुळे आता ‘विकेंड’लादेखील पर्यटक येथे दाखल होतील, असे दिसते. सध्या माध्यमिक शाळा सुरू झाल्या असल्या तरी अजून महाविद्यालये सुरू झालेली दिसत नाहीत.

त्यातच आजपासून सलग तीन दिवस कार्यालये बंद राहणार असल्याने पर्यटक कोकण भ्रमंतीवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारी भागात पर्यटकांची वर्दळ जाणवण्याची शक्यता आहे. किनारी भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली नाही तर पर्यटकांना आनंद घेता येईल. आता वर्ष अखेरीपर्यंत किनारी भागात पर्यटकांची संख्या कमी अधिक प्रमाणात जाणवेल. साधारणपणे गणपतीपुळे ते जिल्ह्यातील रेडी आणि पुढे गोवा राज्यापर्यंत पर्यटकांची वर्दळ जाणवते.

Devgad Tourist Places
लोकसभेसाठी उद्धव ठाकरेंनी बाहेर काढला 'हुकमी एक्का'; थेट उमेदवारी देत अजितदादा गटाचं वाढवलं टेन्शन

व्यावसायिकांना फायदा

दीपावलीनंतर पर्यटन हंगाम तेजीत येतो. पर्यटकांची रेलचेल असली की येथील व्यवसाय तेजीत असतात. खास करून हॉटेल आणि अन्य खाद्यपदार्थ व्यावसायिक तसेच पर्यटनविषयक व्यवसाय यांना चालना मिळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()