Devotional India : देशातल्या या मंदिरात देवाच्या प्रसादाला असते बोकड, बिर्याणी अन् ताडी!

आपल्या ग्रामदैवताच्या म्हाईला, जत्रेला बोकड कापणं, जत्रेच्या पंगती उठणं सामान्य बाब आहे
Devotional india
Devotional indiaesakal
Updated on

आपल्या देशात लोकांच्या श्रद्धेशी संबंधित अनेक गोष्टी अचंबित करतात. श्रद्धा असेल की देव सारे काही देतात हे माहिती असूनही लोक देवाला महागड्या वस्तू, उंची वस्त्र देतात. तर, काही मंदिरांमध्ये बुचकळ्यात टाकणारे पदार्थ प्रसाद म्हणून दिला जातो.

प्रसादाची गोष्ट येते तेव्हा दक्षिण भारतातील तिरूपती बालाजीचा प्रसादाचा लाडू जगात फेमस आहे. तर, काही मंदिरात खिचडी, गुरूद्वाऱ्यातील मोठ्या लंगरमध्ये भात, आमटी दिली जाते. पण, भारतातील काही मंदिरांमध्ये भाविकांना प्रसाद म्हणून मटण, चिकन बिर्याणी दिली जाते.(Devotional India : Indian Temples Where They Serve Non-Veg Prasad)

Devotional india
Pune Tourism : पुण्यात पर्यटनाला प्रचंड वाव

महाराष्ट्राचा विचार केला तर हि गोष्ट फार काही विशेष वाटणार नाही. कारण, आपल्या ग्रामदैवताच्या म्हाईला, जत्रेला बोकड कापणं, जत्रेच्या पंगती उठणं सामान्य बाब आहे. पण, देशातील इतर राज्यात अशा गोष्टी क्वचित एखाद्या मंदिरात होत असतात.  त्यापैकीच काही मंदिरांची माहिती आज जाणून घेऊयात.

Devotional india
National Tourism Day 2023: कोकणात जातच आहात तर यंदाच्या गणेश जयंतीला पेशवेकालीन अती प्राचीन मंदिराला भेट द्या!

विमला मंदिर, ओडिसा

ओडिसात असलेले हे देवीचे मंदिर असून त्यात विमला देवी विराजमान आहेत. नवरात्रीच्या काळात या देवीला ताजे मासे आणि मटणाचा नैवेद्य असतो.  तसेच, देवीसमोर बळी दिलेले बोकडच देवीला नैवेद्य म्हणून दाखवले जाते.

vimala madir odisha
vimala madir odisha
Devotional india
National Tourism Day : पुण्यातसुद्धा अनुभवता येणार तुम्हाला पाण्याखालचं जग

मुथप्पन मंदिर, केरळ

मुथप्पन मंदिर केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील तालिपरंबापासून १० किमी अंतरावर वालापट्टनम नदीच्या काठावर आहे.

या मंदिराचे दैवत श्री मुथप्पन आहे. या मंदिरात आरतीनंतर फणस आणि चहा लोकांना दिला जातो. या प्रसादाव्यतिरिक्त देवाला मासे आणि ताडी अर्पन केले जाते.पुढे त्याच गोष्टी प्रसाद म्हणून दिल्या जातात.

Parassinikadavu Sree Muthappan Temple
Parassinikadavu Sree Muthappan Temple
Devotional india
National Tourism Day : ट्रिपला गेल्यावर एन्जॉय करा चिडचिड नको; असे करा प्लॅनिंग!

मुनियादी स्वामी मंदिर, तामिळनाडू

तामिळनाडूतील वडाक्कमपट्टी येथील मुनियादी स्वामी मंदिरात प्रसाद म्हणून बिर्याणीचे वाटप केले जाते. मुनीश्वर हे खरे तर शिवाचा आणखी एक अवतार म्हणून ओळखले जातात. या मंदिरात प्रसाद म्हणून चिकन आणि मटण बिर्याणी दिली जाते.

ही बिर्याणी गरजू लोकांना वाटण्यासाठी बनवली जाते आणि ती दरवर्षी बनवली जाते. थिरुमंगलम तालुक्यातील वदक्कमपट्टी या छोट्याशा गावात वसलेल्या या मंदिराची ही परंपरा नवीन नाही, परंतु १०० वर्षांहून अधिक काळापासून येथील लोक या परंपरेचे पालन करीत आहेत.

muniyandi swami temple
muniyandi swami temple
Devotional india
Tour to Amboli : थंड हवेच्या ठिकाणांची राणी! पर्यटनाला इथे जाल तर फक्त निसर्ग अन् तुम्ही एवढच दिसेल

कालीघाट, कोलकाता

कालीघाट हे कोलकाता, पश्चिम बंगालमधील एक शक्तीपीठ आहे. मान्यतेनुसार या ठिकाणी आई सतीच्या उजव्या पायाची काही बोटे पडली होती.

आज हे ठिकाण काली भक्तांचे सर्वात मोठे मंदिर आहे. केवळ बंगालच नाही तर देशभरातून आणि जगभरातून लोक आईच्या दर्शनासाठी येतात.

Kalighat temple Kalkata
Kalighat temple Kalkata

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.