पुणे : दिवाळी तोंडावर आली घरी तयारीही सुरू झाली. पण दिवाळी असल्यासारखे काही फिलींगच येईना. असे तुम्हालाही वाटत असेल तर दिवाळीत दिवाळी सारखे फिलींग येण्यासाठी एका ठिकाणी नक्की जा. ते ठिकाण म्हणजे राजस्थान. राजस्थानमधील काही शहरात दिवाळी जल्लोषात साजरी केली जाते.
घराघरात दिवाळीची तयारी सुरू आहे. फराळ, खरेदी, पाहुणेमंडळी यांची रेलचेल असेल. माहेरी आलेल्या बहिणींना घेऊन ट्रिपचे प्लॅनिंग करत असाल तर राजस्थानमधील काही ठिकाणे खास आहेत. राजस्थानातील पुष्कर, जयपूर, जैसलमेर या शहरात दिवाळीचा एक वेगळाच उत्साह अनुभवायला मिळतो. पाहुयात ती शहरे कोणती आणि तिथे कशी साजरी दिवाळी होते.
पुष्कर
राजस्थानमधील पुष्कर शहर हे असे ठिकाण आहे जिथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. दिवाळीच्या दिवशी केवळ भारतातूनच नव्हे तर परदेशातूनही पर्यटक इथली दिवाळी पहायला ती साजरी करायला येतात. दिवाळीच्या वेळी शहराचे सौंदर्य अप्रतिम असते. इथल्या पुष्कर तलावावर जास्त गर्दी असते. हा तलाव दिव्यांनी सजतो. दिव्यांच्या झगमगाटात दिवाळीचा आनंद द्विगुणीत होतो. दिवाळी दरम्यान येथे 5 दिवसांचा उत्सव देखील आयोजित केला जातो.
जयपूर
राजस्थानच्या जयपूर शहरही दिवाळीच्या काही दिवस आधीपासून नववधूप्रमाणे सजते. इथला हवा महल दिव्यांनी सजवला जातो. तेव्हा तो अद्भूत नजारा डोळ्यात साठवण्यासाठी लोक गर्दी करतात. इतर शहरांच्या तुलनेत जयपूरमधील दिवाळी हटके असते. येथे पर्यटकांची अधिक गर्दी असते. येथील बाजारपेठही सुंदर पद्धतीने सजवण्यात आली आहे. इथेही दिवाळीला मोठी जत्रा भरते.Diwali Travel
जैसलमेर
पुष्कर आणि जयपूरमध्ये दिवाळीचा सण धूमधडाक्यात साजरा केला जातो. पण जैसलमेर या दोन शहरांपेक्षा कमी नाही. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर हे संपूर्ण शहर विद्युत रोषनाईने सजते.मातीचे, कृत्रिम दिवे आणि फुलांनी केलेली इथली सजावट पहायला लोक गर्दी करतात. या आनंदाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. दिवाळीच्या दिवशी तिथल्या लोकांनी घातलेले नवे कपडेही आकर्षक असतात.
जयपूर, पुष्कर आणि जैसलमेर व्यतिरिक्त राजस्थानमध्ये इतर ठिकाणी दिवाळी जल्लोषात साजरी केली जाते. बिकानेर, जोधपूर, उदयपूर आणि कोटा व्यतिरिक्त तुम्ही दिवाळीच्या दिवशी ट्रिपचे प्लॅनिंग करू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.