Diwali 2024 : भारतातील काही भागात दिवाळीदिवशी 'राक्षसी दिवे' का पेटवले जातात? काय आहे त्यामागची गोष्ट

Diwali Traditions : दसऱ्यानंतर लवकरच दिवाळीसारखा मोठा सण येणार आहे. दिवाळीची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात
Diwali 2024
Diwali 2024 esakal
Updated on

Diwali dayan diya unique tradition of india :

भारत हा वेगवेगळ्या लोकांचा देश आहे. इथे प्रत्येक राज्यात एक वेगळी वेशभूषा, बोलीभाषा, खाद्य संस्कृती या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या अनुभवायला मिळतात. जसे लोक वेगळे आहेत तसे त्यांची सण उत्सव आणि परंपर साजरा करण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे.

दसऱ्यानंतर लवकरच दिवाळीसारखा मोठा सण येणार आहे. दिवाळीची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण असतो. यावेळी घरात गोड- धोड आणि खरेदी फटाके सर्वच गोष्टी केल्या जातात. त्यामुळे दिवाळी सर्वांचीच लाडकी आहे. 

Diwali 2024
Diwali Vastu Tips For Money: आर्थिक समस्यांनी त्रस्त आहात? मग दिवाळीपूर्वीच करा 'ही' कामे, माता लक्ष्मीची कायम राहील कृपादृष्टी

दिवाळीला मातीचे देवी लावण्याची परंपरा आहे. कोणी वेगवेगळ्या आकारांचे कोणी वेगळे प्रकारांचे दिवे घेतात. आज-काल चिनी लाइट्स,  आकाश कंदील, लाईटच्या माळा यांची पसंती वाढली आहे. पण भारतात काही भागात आजही काही वेगळ्या परंपरा पाळल्या जातात.

आपल्या देशभरात अशी काही राज्य आहेत जिथे दिवाळी हा सण  त्यांच्या परंपरेनुसार साजरा केला जातो. दिवाळीत राक्षसी दिवा लावण्याची प्रथा आहे. स्थानिक भाषेत लोक त्याला डायन दिवा म्हणतात. भारतातल्या काही राज्यात ही प्रथा पाळली जाते. डायन दिवा म्हणजे राक्षसीच्या रूपातील दिवा होय.

Diwali 2024
Diwali 2024 Food And Recipe: यंदा दिवाळीत जाळीदार अन् खुसखुशीत अनारसे बनवायचे आहेत? मग 'हा' व्हिडिओ नक्की पाहा

हा दिवा गावातील कुंभार समाजातील लोक दिवाळीत घरी बनवतात.  लोकही देवाच्या पूजेचा भाग म्हणून तो घरी घेऊन जातात. दिवाळी दिवशी हा दिवा उंबऱ्याच्या बाहेर लावण्याची प्रथा आहे. या दिव्यांच्या आकार त्यांचे वेगळेपण हेच आहे की ते एका राक्षसीच्या रूपातील दिवे असतात.

महाराष्ट्रात किंवा इतर भागात दिवे खरेदी करताना त्यांचा आकार त्यांची नाजूकता आणि सुंदरता हे पाहिलं जातं. पण उत्तर प्रदेश, मध्यप्रदेशातील काही गावात राक्षसी दिवे लावले जातात. ही प्राचिन परंपरा आहे.

Diwali 2024
Diwali Special Stocks: कमाईची सुवर्णसंधी! दिवाळीत कोणते शेअर्स खरेदी करणार? पहा टॉप 10 शेअर्सची यादी

असं करण्यामागचे उद्दिष्ट काय आहे (Diwali Unique Tradition )

दिवाळीत दिवे लावण्यामागे हाच हेतू अन् संदेश असतो की, घरातील नकारात्मकता बाहेर फेकली जावी. घरातील अंधकार दूर व्हावा अन् घर दिव्यांनी उजळून जावं.तोच संदेश हे राक्षसी दिवे देतात. म्हणजेच, हे दिवे लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते.

दरवाज्याजवळ हे दिवे लावणे म्हणजे दिवाळीदिवळी घरात येणारी लक्ष्मी माता प्रसन्न होते. अन् घरात नकारात्मक उर्जा येण्यापासून रोखते असे मानले जाते. त्यामुळे लावले जातात हे राक्षसी दिवे.   

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.