पंचधारा निवासी घुबड

मोहर्लीतून आत गेल्यावर खातोडा गेट लागतो. तो पार केल्यावर कोशे कॅनॉल रोड येतो. डावीकडे रस्ता काटेझरीकडे जातो, सरळ गेल्यावर ताडोबा तलावाकडे जातो.
Panchdhara Owl
Panchdhara OwlSakal
Updated on
Summary

मोहर्लीतून आत गेल्यावर खातोडा गेट लागतो. तो पार केल्यावर कोशे कॅनॉल रोड येतो. डावीकडे रस्ता काटेझरीकडे जातो, सरळ गेल्यावर ताडोबा तलावाकडे जातो.

- डॉ. सुधीर गायकवाड इनामदार

मोहर्लीतून आत गेल्यावर खातोडा गेट लागतो. तो पार केल्यावर कोशे कॅनॉल रोड येतो. डावीकडे रस्ता काटेझरीकडे जातो, सरळ गेल्यावर ताडोबा तलावाकडे जातो; पण तलावाकडे जाताना त्यापूर्वी एक सखल जागा आहे. इथे पाणवठा आहे. तो परिसर ‘पंचधारा’ नावाने ओळखला जातो. ‘माया’ या प्रसिद्ध वाघिणीची ही आवडती जागा. याच पंचधाराचा एक रहिवासी आहे जो हमखास दिसू शकतो, तो म्हणजे मासेमार घुबड!

ताडोब्याला २०१० ला पहिल्यांदा गेल्यानंतर, या अभयारण्याची ओढ दिवसेंदिवस वाढतच गेली. दरवर्षी किमान एक ते दोन वेळा न चुकता जाणे होते. त्यामुळे ताडोबातील बहुतांश वाघांची चांगलीच ओळख पटली आहे आणि बहुतेक सर्वच वाघांचे छायाचित्रण करता आले. त्याचबरोबर ताडोबातील सर्व परिसरदेखील आता ओळखीचा झाला आहे. काटेझरी, आंबेपाट, वसंत बंधारा, जामणी, तेलिया, पंढरपौनी, टाका क्र ९७, एनबोडी, फायर लाईन, जामुंझोरा, अस्वलहीरा, देवडोह, वाघडोह अशी काही मजेशीर तर काही अर्थपूर्ण नावे. आम्ही बहुतांश सफारी मोहर्ली गेटमधूनच केलेल्या असल्यामुळे सर्व प्रभाग क्रमवार पाठ झाले आहेत. पुराणी विहीर परिसरात संध्याकाळी उन्हे कमी झाल्यावर अस्वल दिसू शकते, तसेच फायर लाईन परिसरातून मेन रोडवर येतानाही अस्वल दिसू शकते. कोशे कॅनॉल रोडवर रान डुक्कर, सांभर, वाघ हमखास दिसतातच. ताडोबा तलावात मगर, तसेच किनाऱ्यावर मोहोळ घार हमखास दिसते हे पक्के ज्ञात झाले आहे.

मोहर्लीतून आत गेल्यावर कुठेही न वळता डांबरी रस्त्याने सरळ गेल्यावर खातोडा गेट लागतो. तो पार केल्यावर थोडे पुढे गेल्यावर उजव्या बाजूला वळण घेतल्यास कोशे कॅनॉल रोड येतो. डावीकडे रस्ता काटेझरीकडे जातो, सरळ गेल्यावर ताडोबा तलावाकडे जातो; पण तलावाकडे जाताना त्यापूर्वी एक सखल जागा आहे. इथे पाणवठा असल्यामुळे भर उन्हाळ्यातही हिरवळ असते. गर्द झाडीमुळे येथे सावली व गारवा असतो. ‘माया’ या प्रसिद्ध वाघिणीची ही आवडती जागा. आम्ही कित्येक वेळा येथे ‘माया’ला छायाचित्रित केले आहे. याच ठिकाणी एकदा बिबट्यादेखील पाहिला आहे. याच पंचधाराचा एक रहिवासी आहे जो हमखास दिसू शकतो, तो म्हणजे मासेमार घुबड!

पंख पसरल्यावर चक्क ५५ इंच आकार होणारे हे मोठे घुबड. सर्वप्रथम २०११ ला आम्ही याला पाहिले होते. त्यावेळेस हे दाट सावलीत, फांद्यांआड बसून आमच्यावर नजर रोखून एकटक पाहत होते. पुढच्याच वर्षी पुन्हा ताडोबाला गेल्यावर पंचधाराला थांबलो, तेव्हा हे डावीकडील पाणवठ्याशेजारी जमिनीवरच शांत बसले होते. तेव्हाही ते अंधाऱ्या जागी होते. त्यानंतरच्या वर्षी ते डावीकडील झाडाच्या फांदीवर, अर्धवट पानांआड बसले होते. जवळ जवळ सर्वच ताडोबाच्या सफरींमध्ये ते आम्हाला दिसायचेच; परंतु त्याचे चांगले छायाचित्र अजूनही टिपता आलेले नव्हते.

अगदी अलीकडे म्हणजेच मे २०२२ च्या पहिल्या आठवड्यात ताडोबाला टूर आयोजित केली होती. पहिल्या दोन सफारीला आम्हाला मोहर्लीपासून जवळच असलेल्या जामूनझोराला चार वाघ दिसले. त्यामुळे त्यापलीकडे जाणे झालेच नाही; मात्र दुसऱ्या सफारीदरम्यान वाघांचे छायाचित्रण झाल्यावर ताडोबा तलावापर्यंत जायचे ठरले. पंचधाराला पोहोचलो तेव्हा केवळ एकच जिप्सी थांबलेली दिसली. त्यातील मंडळी जमिनीकडे न बघता समोर पाहत होती. तेव्हाच आम्हाला कळले की घुबड असावे. आम्हीही आमची जिप्सी थांबवली. समोरच मासेमार घुबड होते. या खेपेस ते एका मोकळ्या फांदीवर, आमच्या डोळ्यांच्या रेषेतच बसले होते. प्रकाशसुद्धा चांगला होता व घुबडाच्या मागे हिरवी झाडी होती. त्यामुळे बॅकग्राऊंडदेखील सुंदर होते. अगदी स्वप्नवत सेटिंग होते. १५-२० मिनिटे अप्रतिम छायाचित्रे टिपता आली. त्यानंतर आम्ही तिथून निघालो व आमच्या इतर टूर मेंबर्सना सांगायला अधीर झालो. त्या दिवशी दुपारच्या सफारीदरम्यान आमचे सर्व ग्रुप मेंबर्स पंचधाराला येऊन गेले; पण त्या फांदीवरून ते घुबड उडून गेले होते. आम्हाला मात्र त्या दौऱ्यात वाघांच्या टिपलेल्या छायाचित्रांइतकेच त्या घुबडाचे छायाचित्र कायम लक्षात राहिले.

sudhir_gaikwad03@yahoo.co.in

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()