Dubai Trip Guide : फॅमिलीसोबत ट्रिप प्लॅन करताय तर दुबईशिवाय पर्याय नाही, मुलांसाठी आहेत बऱ्याच Activity तेही फ्री

या मॉलला भेट देण्यासाठी किमान एक दिवस लागतो
Dubai Trip Guide
Dubai Trip Guideesakal
Updated on

Dubai Trip Guide : जेव्हा कधी फॅमिली ट्रिप प्लॅन केली जाते. तेव्हा आवर्जून लहान मुलांसाठी काय नवं पहायला असेल हा विचार केला जातो. तुम्हीही यंदा लहान मुलांसोबत फॅमिली ट्रिप प्लॅन करत असाल. तर, आम्ही एक भन्नाट ऑप्शन तुम्हाला सांगणार आहोत.

तुम्ही दुबईबद्दल ऐकले असेल. तिथल्या उंच इमारती, नयनरम्य समुद्रकिनारे, रस्त्यावर धावणाऱ्या मोठमोठ्या गाड्या आणि बरेच काही. दुबईला स्वप्नांचे शहर म्हटले जाते. दुबई त्याच्या अद्वितीय आणि भव्य वास्तुकलेसाठी ओळखले जाते. दुबईचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच १६३ मजली इमारत आहे. दुबईला येऊन तुम्ही एकाच वेळी अनेक ठिकाणे अनुभवू शकता.

Dubai Trip Guide
Tourism जायफळ आणि दालचिनीसाठी प्रसिद्ध आहे केरळचं हे ठिकाण, ट्री हाऊसमध्ये राहण्याची मजाही लुटा

वाळवंट आणि समुद्रकिनाऱ्यांच्या शोधात असलेल्यांसाठी येथे अनेक पर्याय आहेत, परंतु जर तुम्हाला थंड ठिकाणे आवडत असतील तर त्यासाठीही व्यवस्था आहे. जर तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत कुठेतरी परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर दुबईपेक्षा बेस्ट ऑप्शन असू शकत नाही. चला जाणून घेऊया अशाच काही ठिकाणांबद्दल जे मुलांसोबत एक्सप्लोर करण्यासाठी सर्वोत्तम आहेत.

बेस्ट शॉपिंग डेस्टिनेशन

दुबई हे एक उत्तम शॉपिंग डेस्टिनेशन आहे. इथे एक-दोन नव्हे तर अनेक मॉल्स आहेत, पण सगळ्यात प्रसिद्ध आहे तो दुबई मॉल. असा मॉल तुम्ही क्वचितच पाहिला असेल. तुम्ही दुबई मॉलमधून मुलांसोबत दुबईची ट्रिप एन्जॉय करू शकता. जरी या मॉलला भेट देण्यासाठी किमान एक दिवस लागतो, तरीही तुम्ही येथे येऊन एकाच वेळी अनेक गोष्टींचा आनंद लुटू शकता.

दुबईतील ऍक्वारियम मुलांसाठी बेस्ट आहे
दुबईतील ऍक्वारियम मुलांसाठी बेस्ट आहेesakal
Dubai Trip Guide
Tourism Career : जगभर फिरायचंय? असे होऊ शकता टुरिस्ट गाइड, जाणून घ्या कोर्सची माहिती

दुबई ऍक्वारियम

दुबई मॉलमध्येच मुलांसाठी अनेक आकर्षक गोष्टी बनवण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे ऍक्वारियम आणि अंडरवॉटर झू होय. या झू मध्ये तुम्हाला एखादा दुसरा नव्हे तर तब्बल ६५ हजार समुद्री जीवांचे दर्शन घडते.

स्की दुबई

दुबईत बघावं तिकडं नुसती वाळवंट दिसतात, असं तुम्हालाही वाटत असेल तर तसं नाहीय. दुबईमध्येही अनेक अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आश्चर्यचकीत करतील. त्यापैकीच एक म्हणजे एमिरेट्स मॉलमध्ये असलेले स्की पॉईंट. इथले तापमान हे मायनस २ अंश इतके असते.

इथे तुम्ही उबदार कपडे, स्वेटर न घालताही आरामात गेम्सचा आनंद घेऊ शकता. पूर्णपणे सुरक्षेचा विचार करून मगच मुलांना स्की करू दिले जाते. तुम्ही इथे स्नो पार्कमध्ये खेळण्याचा आनंद घेऊ शकता.

Dubai Trip Guide
World Tourism Day 2023: भारताबाहेरही आहेत हिंदू मंदिरं; परदेशातल्या प्रमुख मंदिरांविषयी जाणून घ्या एका क्लिकवर
मॉलमध्ये असलेले स्की पॉईंट सर्वांचे फेवरेट आहे
मॉलमध्ये असलेले स्की पॉईंट सर्वांचे फेवरेट आहेesakal

3D ब्लॅकलाइट मिनीगोल्फ

मुलांसोबतच एन्जॉय करता येतील अशा अनेक ऍक्टिव्हीटी इथे करता येतात. इथे गोल्फ खेळण्याच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातात. तुम्हाला मुलांसोबत असे गेम खेळायचे असतील तर हे 3D ब्लॅकलाइट मिनीगोल्फ बेस्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.