आज संपूर्ण देशभरात उत्साहात दसरा साजरा केला जात आहे.आज सर्व वाईट गोष्टींचा नायनाट होणार आहे. कारण आज दसरा आहे. दसऱ्यादिवशी प्रभू श्री रामांनी रावणाचा अन् देवीने राक्षसांचा वध करून विजय मिळवला. त्यामुळे आज सर्वत्र सकारात्मक गोष्टी, उत्साह अनुभवायला मिळतो. अनेक गावांच्या विविध परंपराही आहेत.
दसऱ्यातला शुभ मुहूर्त मानला जातो. त्यामुळे सर्वत्र तो साजरा केला जातो. दसऱ्या दिवशी रावणाचे दहन केले जाते. पण भारतातल्या एका गावात दुसऱ्या दिवशी दुःखवटा साजरा केला जातो. त्याला कारणही तसच आहे. (Unique tradition of dussehra)
उत्तर प्रदेश मधील मेरठ पासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या गगोल गावात दसरा साजरा केला जात नाही. एक दोन वर्षात नव्हे तर गेल्या १६६ वर्षांपासून इथं दसरा साजरा केलेला नाही. गावकऱ्यांनी दसऱ्याला सुतक पाळण्याचं कारण ऐकून तुम्हीही भावुक व्हाल.
गोष्ट १६६ वर्षांपूर्वीची आहे. मेरठमधील या गावात त्या काळात सर्वत्र देशभक्ती देश क्रांती ज्वाला पेटली होती. मेरठ मध्येच नव्हे तर संपूर्ण देशभरात लोक स्वातंत्र्यासाठी जिवाची बाजी लावत होते. तेव्हा या गावची लोकसंख्या कमी असेल पण आत्ता या गावची लोकसंख्या १८०० च्या वर आहे. तरीही इथले लोक दसरा साजरा करत नाहीत.
जेव्हा लोक देशासाठी बलिदान देत होते त्या काळात इंग्रजांनी या गावातील नऊ लोकांना फाशी दिली होती. ते नऊ लोक स्वातंत्र्य सैनिक होते. आणि दुःखद गोष्ट म्हणजे या सर्व लोकांना दसऱ्या दिवशी फाशी दिली. कितीही या गावात असलेल्या एका पिंपळाच्या झाडावरती.
गावातील लोकांनी या गोष्टीचा खूपच धसका घेतला होता. ती गोष्ट त्यांच्या डोळ्यासमोर घडली होती. त्यामुळे तेव्हापासून दसऱ्याच्या दिवशी इथे कुठलाही गोड पदार्थ केला जात नाही. कुठलाही उत्सव साजरा केला जात नाही. तसेच विजयादशमी म्हणजे गावभर सुतक पाळलं जातं. अशी गावाची गोष्ट आहे.
निरापराध स्वातंत्र्यसैनिकांना ज्या झाडाला फाशी देण्यात आली होती. ते पिंपळाचे झाड आजही या गावात आहे. इथे या लोकांनी समाधीही बांधण्यात आली आहे. त्या झाडाखाली गेलं की काहीतरी वेगळं वाटतं. जणू ते झाडही आपल्याशी बोलू पाहतं असं गावकरी सांगतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.