Father’s Day 2022 : दरवर्षी फादर्स डे जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस 19 जून 2022 रोजी साजरा केला जाणार आहे. वडिलांबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी फादर्स डे साजरा केला जातो. वडिलांचे महत्त्व मोजक्या शब्दात वर्णन करणे कठीण आहे, जर तुम्हालाही यंदाचा फादर्स डे संस्मरणीय बनवायचा असेल तर, वन डे पिकनिकसाठी महाराष्ट्रातील ही पाच ठिकाणं तुम्हला नक्कीच उपयुक्त अशी ठरतील. (One Day Picnic Spot On Fathers Day)
अलिबाग
अलिबागमध्ये कनकेश्वर मंदिर असून हे शिवमंदिर शहारापासून 12 किमी अंतरावर असून, हे मंदिर 900 फूट उंच टेकडीवर बांधलेले आहे. याठिकाणी मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी यात्रेकरूंना 500 पायऱ्या चढून जाव्या लागतात. हे मंदिर राजा रामदेव यादव यांनी बांधले होते. या मंदिराचा परिसर अतिशय सुंदर असा असून, परिसरात हनुमान, बलराम कृष्ण आणि पालेश्वर यांचीही मंदिरे आहेत. येथे तुम्ही भीमा कुंड, फुलांची बाग आणि नगर खाना पाहू शकता. दरवर्षी कार्तिक पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर येथे जत्रा भरते. या मंदिरात स्थापित केलेली सुमारे 54 फूट उंचीची शंकराची मूर्ती पाहण्यासारखी आहे.
याशिवाय तुम्ही किहीम बीच, अक्षय बीच, मांडवा बीच, काशीद बीच, वरसोली बीच, नागाव बीच आणि मुरुड बीच हे अलिबागमधील लोकप्रिय समुद्रकिनारे असून, पर्यटक खांदेरी किल्ला, कुलाबा किल्ला, मुरुड-जंजिरा किल्ला, विक्रम विनायक मंदिर किंवा बिर्ला मंदिर, चुंबकीय वेधशाळा आणि कोरलाई किल्ल्यालादेखील भेट देऊ शकतात.
औरंगाबाद
जर, तुम्ही यंदाच्या फादर्स डे ला वडिलांना एक दिवस फिरायला घेऊन जाण्याचा विचार करत असाला तर, औरंगाबाद शहराजवळ असलेल्या अनेक ठिकाणांचा तुम्ही विचार करू शकता. यामध्ये तुम्ही शहरापासून 30 किमी अंतरावर असणाऱ्या वेरूळला भेट देऊ शकता. या लेणी सह्याद्रीच्या सातमाळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या आहेत. इ.स. 1951 साली भारत सरकारने या लेण्यांना 'राष्ट्रीय स्मारक' म्हणून घोषित केले आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडे सोपवण्यात आली. लेण्यांशिवाय याठिकाणी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले घृष्णेश्वर मंदिरदेखील आहे.
पुणे
तुम्ही पुण्यात वास्तव्यास असाल आणि फादर्स डेला वडिलांना फिरायला घेवून जाण्याचा तुम्ही विचार करत असाल तर, तुम्ही देहू, आळंदी, नारायणगाव, केतकावळे आदी ठिकाणांसह अष्टविनाय गणपतींपैकी एका ठिकाणाची निवड करू शकता. केतकावळे येथे तिरूपती बालाजीचे मंदिर असून, या मंदिराला प्रतीबाजाली या नावाने ओळखले जाते. याशिवाय तुम्ही पुणे-अहमदनगर रोडवर शिरूर जवळ मोराची चिंचोली या पर्यटन स्थळाचाही विचार करू शकता. या ठिकाणी मोरांचे वास्तव्य असल्याने याला मोराची चिंचोली असे नाव पडले आहे. मोकळ्या वातावरणात फिरणारे मोर पाहण्यासाठी पर्यटक या गावाला भेट देतात. वरील ठिकाणांशिवाय तुम्ही लोणावळा, खंडाळा, भिमाशंकर, जेजुरी, माथेरानसह धरण क्षेत्रालाही भेट देऊ शकता.
नाशिक
नाशिक हे उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर असून, हे महाराष्ट्रातील निसर्गरम्य पर्यटन स्थळांपैकी एक आहे. येथील उत्तम दर्जाची दाक्षं आणि वाईनसाठी ओळखलं जातं. शिवाय नाशिक हे गोदावरीच्या कुशीत वसलेले एक तिर्थक्षेत्रदेखील आहे. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योर्तिलिंगापैकी एक आहे. या मंदिराच्या चारी बाजुंना कोट बांधलेला असून पूर्वेकडे मुख्य दरवाजा आहे. मंदिरावर अतिशय सुंदर कोरिवकाम करण्यात आलेले आहे. याशिवाय नाशिक जिल्हात वणी येथे सप्तश्रृंगी देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. नांदुरी गावाजवळील वणी गडावर वसलेली ही देवी अनेक घराण्यांची कुलदैवता आहे. सप्तश्रुंगी हे आदिशक्तीचे मुळ रूप मानले जाते. या मंदिरातील देवीची मुर्ती स्वयंभू असून तिच्या गाभाऱ्याला शक्तिहार, सुर्यहार आणि चंद्रहार असे तीन दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाज्यांतून देवीचे दर्शन घडते.
नागपूर
तुम्ही विदर्भात राहत असाल आणि यावर्षी फादर्स डे ला वडिलांना फिरायला घेऊन जाण्याची योजना तुम्ही आखली असेल तर, या ठिकाणी अनेक ठिकाणं आहेत. तुमचा वडिलांचा स्वभाव कसा आहे त्यांना कुठे फिरायला आवडतं त्यानुसार तुम्ही योग्य ठिकाणाची निवड करू शकता. एक दिवस फिरण्यासाठी तुम्ही दीक्षाभूमी, श्री पोद्दारेश्वर राम मंदिर, जपानी रोझ गार्डन, अंबाझरी तलाव, ड्रॅगन पॅलेस मंदिर, रमण विज्ञान केंद्र, उमरेड कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्य, पेंच व्याघ्र प्रकल्प, रामटेक किल्ला, क्रेझी कॅसल मनोरंजन पार्क, श्री गणेश मंदिर (टेकडी गणपती), सीताबर्डी किल्ला, सेमिनरी हिल, लता मंगेशकर म्युझिकल गार्डन आदी ठिकाणांची निवड करू शकता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.