Bhilar Pathar : 'कास'नंतर आता पर्यटकांना खुणावतोय भिलारचा फुलोत्सव; सह्याद्री पठारावर पसरली रंगीबेरंगी फुलांची झालर

भिलार परिसरातील डोंगरमाथ्यावरील पठारे विविध रानफुलांनी बहरली आहेत.
Flower Season Mahabaleshwar Bhilar Pathar
Flower Season Mahabaleshwar Bhilar Patharesakal
Updated on
Summary

सरत्या पावसातील गिरीभ्रमंती नेहमीच नेत्रसुखद आणि डोळ्यांचे पारणे फेडणारी असते.

भिलार : भिलार येथील टेबल पॉइंट, एअर पोर्ट रोड तसेच परिसरातील डोंगरमाथ्यावरील पठारे विविध रानफुलांनी बहरली आहेत. अनेक पर्यटक, पर्यावरणप्रेमी या फुलोत्सवाचा आनंद घेण्यासाठी गर्दी करत आहेत.

नाजूक, रंगीबेरंगी रानफुलांची, कुठे गुलाबी तर कुठे निळ्या, कुठे पिवळ्या तर कुठे जांभळ्या रानफुलांची आरास सह्याद्रीच्या पठारावर उगवल्याने पर्यटक आकर्षित होत आहेत. महाबळेश्‍वर (Mahabaleshwar) तालुक्यातील पाचगणी येथील प्रसिद्ध टेबल पॉइंट, संजीवन व न्यू इरा स्कूलची मैदाने तसेच भिलार, राजपुरी, आंब्रळ, खिंगर, सायघरची पठारे, करहर, पाचगणी रस्ता व काटवली घाटाच्या दुतर्फा रंगीबेरंगी फुलांची झालर पसरली आहे.

Flower Season Mahabaleshwar Bhilar Pathar
Strawberry Crop : महाबळेश्वरात तब्बल 50 लाख स्ट्रॉबेरीचे मदरप्लांट परदेशातून आयात; उत्पादन खर्च वाढल्याने शेतकरी मेटाकुटीला

एरवीही उन्हाळ्यात बोडकी दिसणारी पठारे पावसाळ्यात मात्र, हिरवागार गालिचा पसरलेला पाहायला मिळतो. सरत्या पावसातील गिरीभ्रमंती नेहमीच नेत्रसुखद आणि डोळ्यांचे पारणे फेडणारी असते. जमिनीलगत पसरलेल्या गवतापासून ते शेजारच्या बळकट झाडाचा आधार घेत वाढणाऱ्या वेलीपर्यंत तऱ्हेतऱ्हेच्या वनस्पतींवर ही रानफुले पाहायला मिळतात.

Flower Season Mahabaleshwar Bhilar Pathar
विषारी समजणाऱ्या रुईच्या झाडापासून बनवलं 'या' आजारावर औषध; प्रा. सुमेधा बनेंना मिळालं भारत सरकारकडून 'पेटंट'

पावसाळ्यात हिरवाई असल्याने, त्यावरच्या फुलांचे अस्तित्व लगेच कळते. त्यातही ऊन-पावसाची लपाछपी सुरू होते, तेव्हा रानफुलांचा हंगाम सुरू होतो. भिलारमध्ये मिकी माऊस या फुलांचा जणू सडाच पडल्याचे भासते. त्यामुळे ही विविधरंगी फुले पाहण्यासाठी विद्यार्थी तसेच पर्यटक या फ्लॉवर व्हॅलीकडे आकर्षित होत आहेत. या परिसरात विविध कृषी पर्यटन निवासस्थाने असल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांना ही मोठी पर्वणी असल्याचे विश्‍वनाथ भिलारे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.