Kaas Pathar : जगप्रसिद्ध कास पठारावर फुलांचा अधिकृत हंगाम सुरू; 'या' तारखेनंतरच पाहता येणार फुलांचे गालिचे!

पठारावर चवर (रानहळद) मोठ्या प्रमाणात बहरली असून या फुलांचे पांढरेशुभ्र गालिचे मनमोहक दिसत आहेत.
Kaas Plateau Mahabaleshwar Tourism Satara
Kaas Plateau Mahabaleshwar Tourism Sataraesakal
Updated on
Summary

ऑगस्ट महिन्यात पावसाने दिलेली ओढ व काही वर्षांपासून हवामानातील बदल यामुळे फुले उमलण्यास उशीरा सुरुवात होत आहे.

कास : आपल्या अलौकिक सौंदर्याने लाखो पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय असलेल्या कास पठारावर फुलांचा अधिकृत हंगाम सुरू झाला असला, तरी कासची (Kaas Pathar) फुले प्राथमिक अवस्थेतच आहेत. मोठ्या प्रमाणावर फुलांचे गालिचे बहरण्यासाठी पंधरा सप्टेंबर नंतरच सुरूवात होईल, असे सद्यस्थितीवरून वाटत आहे.

Kaas Plateau Mahabaleshwar Tourism Satara
Kaas Pathar : कास पठारावरील फुलं पहायला जाताय? मग 'इतके' पैसे सोबत ठेवाच, नाहीतर परत माघारी फिरावं लागेल!

पावसाळा सुरू झाला की, कासला फुलांची चाहूल लागते. जून, जुलै महिन्यात येथील जीवसृष्टी बाळसे धरते. पूर्ण कातळ खडक असलेलं पठार हिरवा रंग परिधान करतं. यातूनच हजारो प्रकारच्या फुलांच्या प्रजाती उगवण्यास सुरूवात होतात. पंधरा ऑगस्टनंतर फुले उमलण्यास सुरूवात होते.

पण, यावर्षी ऑगस्ट महिन्यात पावसाने दिलेली ओढ व काही वर्षांपासून हवामानातील बदल यामुळे फुले उमलण्यास उशीरा सुरुवात होत आहे. त्यामुळे यावर्षी एक सप्टेंबर नंतरच फुलांच्या प्रजाती फुलू लागल्या. सद्यस्थितीत पठारावर चवर (रानहळद) मोठ्या प्रमाणात बहरली असून या फुलाचे पांढरेशुभ्र गालिचे मनमोहक दिसत आहेत.

Kaas Plateau Mahabaleshwar Tourism Satara
कास पठारावर विविधरंगी फुलं बहरली; फुलोत्सवाचा खरा हंगाम कधी? जाणून घ्या तारीख

चवरनंतर पठाराला मोठ्या प्रमाणात आच्छादित करतात ते लाल, गुलाबी तेरडा, पांढरे गेंद व निळी सीतेची आसवे ही फुले. तेरड्याने दर्शन द्यायला सुरुवात केली असून पांढरे गेंद व निळी सितेची आसवे ही काही प्रमाणात उमलू लागली आहेत. या तीन फुलांची लाल, निळी, पांढरी छटा पठाराला खरा साज देते.

इतर बाकीची दुर्मिळ फुले कमी प्रमाणात असतात. यामध्ये आभाळी, नभाळी, दिपकांडी, मंजिरी, हिरवी निसुर्डी, पिवळी सोनकी ही फुले काही प्रमाणात दिसत आहेत. पठारावरील दुर्मिळ फुले व जीवसृष्टी समजून घ्यायची असेल तर समितीच्या वतीने उपलब्ध असलेले गाईड घेतल्यास ही फुले समजून घेता येतात.

Kaas Plateau Mahabaleshwar Tourism Satara
Rain Update : पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं दमदार कमबॅक; कोयना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस, महाबळेश्वरला 88 मिलिमीटर पावसाची नोंद

पठाराला जीवदान...

संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाची छाया असताना पावसाचे माहेरघर असणारा हा परिसर ही गेल्या तीन आठवड्यांपासून पावसापासून वंचित होता. परिणामी, पठारावरील फुले व जीवसृष्टी धोक्यात आली होती. पण, दोन दिवसांपासून पावसाने कमबॅक केल्याने पठाराला जीवदान मिळाले असून फुले चांगली बहरतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Kaas Plateau Mahabaleshwar Tourism Satara
प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! फोंडा, परशुराम घाटात कोसळली दरड; मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीची काय आहे स्थिती?

शनिवारी तीन हजारांच्या वरती पर्यटकांची भेट

हंगामाचे उद्घाटन झाल्यानंतर आलेला हा पहिलाच शनिवार असल्याने काल ऑनलाईन बुकिंग करून १८०० पर्यटक आले होते तर प्रत्यक्ष जागेवर बुकिंग करून दिवसभरात तीन हजारांहून अधिक पर्यटकांनी फुलांचा आनंद घेतला.

आताची फुले समाधानकारक, पण..

आम्ही कास समितीच्या वेबसाईटवरील फोटो पाहून आज फुले पाहण्यासाठी आलो होतो. आताची फुले समाधानकारक असली तरी मोठ्या प्रमाणात गालिचे पाहता आले नाहीत याची खंत आहे.

-विशाल कायरकर, पर्यटक पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.