पर्यटनासाठी अंदमान-निकोबारचा प्लॅन करताय?, 'या' बेटांना नक्की भेट द्या

येथील निसर्गसौंदर्य अनुभवासाठी जगभरातील पर्यटक अंदमानला येतात.
पर्यटनासाठी अंदमान-निकोबारचा प्लॅन करताय?, 'या' बेटांना नक्की भेट द्या
Updated on

अंदमान आणि निकोबार द्वीपसमुह हे एक असं ठिकाण आहे, जिथे गेल्यानंतर तुम्ही निसर्ग सौंदर्याच्या प्रेमात पडाल. येथे असणारे सुंदर समुद्रकिनारे, वन्यजीव अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्याने पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. येथील निसर्गसौंदर्य अनुभवासाठी जगभरातील पर्यटक अंदमानला येतात. तुम्हालाही अंदमान-निकोबार बेटांवर फिरायचे असेल तर अशा पाच ठिकाणांबद्दल सांगत आहोत...

हॅवलॉक बेट

हॅवलॉक द्वीप किंवा स्वराजद्वीप हे अंदमानचे सर्वात लोकप्रिय बेट आहे. येथील पांढरेशुभ्र समुद्र किनारे, हिरवीगार जंगले आणि जलचर प्राण्यांची दुनिया पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी भेट देतात.

बॅरेन बेट

बॅरेन बेटावर देशातील एकमेव सक्रीय ज्वालामुखी आहे. अंदमान समुद्रातील सक्रिय टेक्टोनिक प्लेट्समध्ये हे बेट वसलं आहे. भेट देऊ शकणार्‍या अंदमानातील सर्वोत्तम आकर्षणांपैकी हे एक आहे. या बेटावर कोणालाही जाण्याची परवानगी नसून या बेटावरील सौंदर्य फक्त दुरुनच पाहता येईल. येथे शेवटचा ज्वालामुखीचा उद्रेक 1994-95 च्या सुमारास झाला होता.

चिडिया बेट

तुम्ही अंदमानला भेट देण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही तुमच्या यादीत चिडिया बेटाचा समावेश केला पाहिजे. चिडिया बेट हिरवाईने आणि खारफुटीच्या जंगलांनी नटले आहे. येथे स्थलांतरित पक्ष्यांच्या अनेक प्रजाती तसेच विदेशी फुले व प्राणी येथे आढळतात.

वंदूर बीच

वंदूर बीच हे अंदमान येथील अतिशय प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. जे लोक शांत समुद्रकिनाऱ्यावर सुट्टी घालवण्याची योजना आखणार असेल तर त्यांच्यासाठी वंदूर बीच योग्य आहे. इथे गर्दी कमी असली तरी हा बीच अंदमानमध्ये फॅमिली व्हेकेशनसाठी योग्य आहे.

माउंट हॅरिएट राष्ट्रीय उद्यान

अंदमानमध्ये भेट देण्यासाठी सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक म्हणजे माउंट हॅरिएट नॅशनल पार्क. या ठिकाणी जंगल, समुद्रकिनारे आणि पर्वतांवर एक सुंदर उद्यान तयार करण्यात आले आहे. जर तुम्हाला सुंदर समुद्रकिनाऱ्यांवर आराम करायचा असेल तर या उद्यानात सुंदर समुद्रकिनाऱ्यांना भेट देऊ शकता. विशेष म्हणजे येथे हिरवाईने नटलेले डोंगर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.