Road Trip: रोड ट्रिपची वेगळीच मजा असते. अनेकजण रोड ट्रिपचा आनंद घेण्यासाठी बऱ्याचदा सहजही घराबाहेर पडतात. विदेशाबाहेर जर तुम्हाला फिरायला जायचे असेल तर फ्लाइट आणि व्हिजा या दोन गोष्टी महत्वाच्या आणि खर्चिक असतात असे अनेकांना वाटते. मात्र आज आपण कमी खर्चात आणि व्हिजा शिवाय कारने प्रवास करता येणाऱ्या देशांबाबत जाणून घेऊया.
नेपाळ - तुम्ही कारने नेपाळला गेल्यास तुम्ही या देशातील निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव घेऊ शकता. या रोड ट्रिपमध्ये तुम्हाला अनेक सुंदर दृश्ये दिसतील. या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला वेगळ्या लायसंसचीही गरज नाही. तुम्ही भारतीय लायसंसच्या आधारावर नेपालमध्ये फिरायला जाऊ शकता. तुम्ही दिल्लीहून काठमांडूला जात असल्यास तुम्हाला सोनौली बॉर्डरवरून नेपालमध्ये एन्ट्री करता येईल. रोडने दिल्ली नेपाळपासून 1079 किली दूर आहे.
थायलंड - जर तुम्ही थायलंडला जाण्याचा विचार करत असाल तर फ्लाइटने जाण्याऐवजी रोड प्रवास करा. तुम्ही गाडीने प्रवास केल्यास थायलंडचं कल्चर आणखी जवळून अनुभवू शकाल. येथे चर्च आणि मंदिरे आहेत जेथे जाऊन तुम्हाला प्रसन्न वाटेल. तुमचा ट्रिप बजेट कमी असल्यास तुम्ही थायलंडला चांगला एंजॉय करू शकता. यासाठी तुम्हाला व्हिजा आणि स्पेशल परमिटचीही गरज भासणार नाही. दिल्लीपासून थायलंड 4138 किमी दूर आहे. तुम्हाला इथे पोहोचायला 75 तासांचा वेळ लागतो.
भूटान - नेपाळप्रमाणेच भूटानमध्येही भारतीय सहज एन्ट्री करू शकतात. तुम्ही या ठिकाणी रोड ट्रिप करणार असल्यास तुम्हाला अडचणी येणार नाहीत. येथे जाण्यासाठीही तुम्हाला पासपोर्ट किंवा विजाची गरज पडणार नाही. येथे मात्र एक गोष्ट अवश्य लक्षात ठेवा की भूटान बॉर्डरला एन्ट्री करण्याआधीच गाडीचा नंबर रजिस्टर करून घ्या. रोडने दिल्ली ते भूटान 1915 किमा आहे. येथे पोहोचण्यासाठी 37 तास लागतात.
बांग्लादेश - बांग्लादेश हा भारताचा शेजारी देश आहे. येथे जाण्यासाठी ढाका ते चित्तगोंग हायवे हा सगळ्यात सुरक्षित रस्ता आहे. येथे जाण्यासाठी मात्र पासपोर्ट लागतो. शिवाय भारतीयांना बाग्लादेशाचा व्हिजा पण सहज मिळतो. रोडने दिल्ली ते बांग्लादेश हे अंतर 1799 किमी आहे. येथे पोहोचण्यासाठी 32 तास लागतात.
मलेशिया - मलेशिया हा असा एक देश आहे जेथे तुम्ही रोड ट्रिपचा मनभरून आनंद घेऊ शकता. दिल्लीहून क्वालालंपुर पोहोचण्यासाठी तुम्हाला म्यानमार आणि थायलंड या दोन देशांतून जावे लागेल. येथे जाण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट, ड्रायविंग लायसंस आणि व्हिजा आवश्यक आहे. दिल्ली ते मलेशिया हे अतंर 5536 किमी आहे. येथे पोहोचण्यासाठी 95 तास लागतात.
श्रीलंका - रोड ट्रिपने तुम्ही श्रीलंकेची ट्रिपही एंजॉय करू शकता. ही ट्रिप करताना तुम्हाला ६ देश पडतील. त्यामुळे तुम्ही एकावेळी ६ देशांच्या सहलीचा आनंद घेऊ शकाल. दिल्ली ते श्रीलंका 3571 किमी दूर असून येथे जाण्यास 84 तास लागतात.
तुर्की - तुम्हाला ड्राइव करायला आवडत असल्यास तुम्ही या देशात लाँग ड्राइव्हचा आनंद घेऊ शकता. या ट्रिपदरम्यान तुम्हाला अनेक अनुभव मिळतील. तुर्की पोहोचल्यानंतर तुम्हााला एकापेक्षा एक सुंदर दृश्ये बघायला मिळतील. येथे तुम्हाला सुंदर समुद्रकिनारा दिसेल. रोडने दिल्ली ते तुर्कीचं अंतर 3993 किमी आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.