Ganga Vilas : जगातले सर्वात मोठे क्रूझ गंगा नदीत; सन डेक, स्पाचाही घेता येणार आनंद

गोव्यात गेल्यावर क्रूझमध्ये बसायचे प्लॅन्स तिथे पोहोचण्याआधीपासूनच
Ganga Vilas
Ganga Vilasesakal
Updated on

Ganga Vilas : गोव्यात गेल्यावर क्रूझमध्ये बसायचे प्लॅन्स तिथे पोहोचण्याआधीपासूनच केले जातात. अथांग समुद्रात फिरण्याचा याहून सुंदर अनूभव घेता येणार नाही. पण हा आनंद आता गंगा नदीतही घेता येणार नाही.

Ganga Vilas
Ganga River: गंगेच्या पाण्याच्या गुणवत्ता स्तरात घट, शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा

कारण, काशीहून जगातील सर्वात लांब नदीवरील क्रूझचा प्रवास 10 जानेवारीपासून वाराणसी येथून सुरू होईल. वाराणसी ते दिब्रुगढ हा प्रवास 52 दिवसांत पूर्ण होईल. पुढील वर्षी, म्हणजे 10 जानेवारी 2023 रोजी 'गंगा विलास क्रूझ जहाज' नावाचे लक्झरी क्रूझ जहाज आपल्या 3200 किलोमीटरच्या प्रवासाला निघेल.

Ganga Vilas
Accident In River Ganga : बोटीत सिलिंडरचा स्फोट होऊन ४ जणांचा मृत्यू

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी वाराणसीतील रविदास घाटावरून गंगा विलास क्रूझचे वेळापत्रक जाहीर केले. 52 दिवसांचा हा प्रवास भारत आणि बांगलादेशातील 27 नदी प्रणालींमधून जाईल आणि जागतिक वारसा स्थळांसह 50 हून अधिक महत्त्वाच्या ठिकाणी थांबेल.

Ganga Vilas
Ganga Dussehra 2022: गंगा दसर्‍याला बनलेत 4 शुभ संयोग; 'हे' काम केल्याने बदलेल आयुष्य!

यात सुंदरबन डेल्टा आणि काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्य, जलकुंभ आणि अभयारण्यांचाही समावेश आहे. लांबचा प्रवास कंटाळवाणा वाटू नये. यासाठी क्रूझमध्ये संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, जिम इत्यादी सुविधा असतील.

Ganga Vilas
Food Recipe : रोज पोळी खाऊन कंटाळा आलाय; हॉटेलसारखी मऊसूत रुमाली रोटी बनवा घरच्या घरी

भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता रवी कांत म्हणाले की, गंगा विलास हे भारतातील पहिले जहाज आहे. यामध्ये बाथरूम, शॉवर, कन्व्हर्टेबल बेड, फ्रेंच बाल्कनी, एलईडी टीव्ही, तिजोरी यासह आधुनिक जीवनरक्षक प्रणाली देखील असेल.

Ganga Vilas
Food: रोज रोज डब्याला काय करायचं? मेथीचे हे पाच प्रकार ट्राय करा

याशिवाय या ट्रिपला अधिक संस्मरणीय बनवण्यासाठी 40 सीटर रेस्टॉरंट, सन डेक आणि स्पा आहे. या जहाजामधून एकावेळी 80 प्रवासी प्रवास करू शकतील. हे जहाज आधुनिक सुविधांनी सुसज्ज असून पूर्णपणे सुरक्षित आहे. ही क्रूझ 80 पर्यटकांना घेऊन 3200 किलोमीटरचा प्रवास 52 दिवसांत पूर्ण करेल.या 'गंगा विलास क्रूझ'ची लांबी 62.5 मीटर आणि रुंदी 12.8 मीटर असेल. भारतात बांधलेले हे पहिले नदी जहाज आहे. यात 18 सर्वोत्तम रूम्स असतील. ज्यात प्रवासी प्रवास करतील.

Ganga Vilas
Energy Foods : महिलांनी ऊर्जा मिळवण्यासाठी खावेत हे पदार्थ

गंगा विलास क्रूझ वाराणसी बक्सर, रामनगर, गाझीपूर मार्गे 8 व्या दिवशी पाटण्याला पोहोचेल. पाटणा येथून 20 तारखेला कोलकात्याला पोहोचेल. दुसऱ्या दिवशी ते बांगलादेशात प्रवेश करेल. ती बांगलादेशमध्ये पाण्यात १५ दिवस राहील. तेथून कोलकात्यात दिब्रुगड येथे या प्रवासाचा शेवट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.