रेल्वे प्रवास तिकिटावर 'या' सेवांचाही मिळतो मोफत लाभ!

railway ticket
railway ticketesakal
Updated on

तुम्हाला हे माहित आहे का? रेल्वेचे हे तिकीट फक्त तुम्हाला रेल्वेमध्ये बसण्याचाच अधिकार देत नाही, तर या तिकीटामुळे तुम्ही आणखी काही गोष्टींचा लाभ देखील घेऊ शकता, ते सुद्दा मोफत...हो हे खरं आहे...पण याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. जसं की आपल्या सर्वांना माहित आहे, की ट्रेनने प्रवास करण्यासाठी तिकीट काढणे आवश्यक असते आणि लांबच्या प्रवासासाठी रेल्वेचं रिजर्वेशन तिकीट (आरक्षित तिकीट) घ्यावे लागते. ज्यामुळे लोकांना आरामदायी प्रवास करता येतो. परंतु रेल्वे तिकीटाबद्दल तुम्हाला ही महत्वाची गोष्ट माहित आहे का? तर मग चला जाणून घेऊया की रेल्वेचा प्रवास करताना तुम्ही कोणत्या-कोणत्या सेवांचा लाभ घेऊ शकता.

विमा

रेल्वेचा प्रवास करताना तुम्हाला (insurance) म्हणजेच विम्याची सुविधाही मिळते. हो हे खरं आहे. या विमा अंतर्गत रेल्वे अपघात, चोरी, लूट किंवा अशा कोणत्याही परिस्थितीसाठी कव्हरेज उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला फक्त 49 पैसे खर्च करावे लागतील. पण तुमचा रेल्वे प्रवास अगदी सुरक्षित असेल.

railway ticket
लॉकडाऊनच्या काळात मांजरींनाही आले नैराश्य, संशोधनाचा निष्कर्ष

वायफाय (Wi-Fi)

जर तुमची ट्रेन यायला बराच वेळ बाकी असेल आणि तुम्हाला स्टेशनवर बसून कंटाळा आला असेल तर तुम्ही मोफत वायफायचा आनंद घेऊ शकता. ही सुविधा बहुतेक रेल्वे स्थानकांवर उपलब्ध आहे. याचा वापर करून तुम्ही इंटरनेट सुरू करून चित्रपट, सोशल मिडिया पाहण्याचा आनंद घेऊ शकता.

प्रथमोपचार पेटी (first aid kit)

जेव्हा तुम्ही ट्रेनमध्ये जाता आणि तुम्हाला प्रवासादरम्यान औषध इत्यादींची आवश्यकता असते, तेव्हा तुम्ही TTE कडून त्याची मागणी करू शकता. प्रत्येक प्रवाशाला रेल्वेने ही सुविधा दिली आहे.

railway ticket
आता 'या' वेळेतच घ्या Green Tea अन् आजारांना करा छु मंतर

वेटिंग रूम

ट्रेन येईपर्यंत तुम्ही रेल्वे स्थानकावरील वेटिंग रुमला बसू शकता.यासाठी तुम्हाला रेल्वेने सुविधा दिली आहे पण यासाठी तुमच्याकडे तिकीट असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही तुमच्या तिकिटाच्या वर्गानुसार वेटिंग रूममध्ये सहज आराम करू शकता.

क्लोक रूमची सुविधा

ज्या लोकांकडे ट्रेनची तिकिटे आहेत ते स्टेशनवरील क्लोक रूम वापरू शकतात आणि त्यांचे सामान जमा करू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()