लहानपणी प्रत्येकाने फुलपाखरांच्या मागे धाव घेतलेली असते. प्रत्येकाला फुलपाखरांचे विशेष आकर्षण असतं. सध्या क्वचितच फुलपाखरू पहायला मिळतं. एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी गेलं तरच लहान मुलांना फुलपाखराचं दर्शन होतं. तुम्हाला माहितीये का? की, गोव्यात असं ठिकाण आहे जिथं फुलपाखरांचं गाव आहे.
जर तुम्ही नोव्हेंबर महिन्यात गोव्याला जात असाल, तर तुमच्या बकेट लिस्टमध्ये बटरफ्लाय कंझर्व्हेटरीचा समावेश करा. कारण हीच वेळ आहे जेव्हा तुम्ही या कंझर्व्हेटरीमध्ये फुलपाखरांच्या अनेक प्रजाती पाहू शकता. निसर्गप्रेमी डॉ. ज्योती आणि यशोधन हेबळेकर यांनी 2009 मध्ये गोव्यात बटरफ्लाय पार्क सुरू केले आहे. (Butterfly Park )