Amboli Forest : आता आंबोली जंगल सफरीसाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये; वन विभागानं घेतला महत्वाचा निर्णय

वन व्यवस्थापन समिती कर आकारणी करून त्यासोबत गाईड देणार आहे.
Amboli Forest
Amboli Forestesakal
Updated on
Summary

आंबोलीत ग्रामपंचायत संयुक्त वन व्यवस्थापन समितीमार्फत शुल्क ठरविण्यात आले आहे.

आंबोली : येथील जंगलात (Amboli Forest) फिरण्यासाठी आणि फोटो काढणाऱ्यांसाठी वन विभागाने (Forest Department) आंबोलीत ग्रामपंचायत संयुक्त वन व्यवस्थापन समितीमार्फत शुल्क ठरविण्यात आले आहे. जंगलाची माहिती आणि दर निश्चित केल्याचे फलक वन विभागाने लावले आहेत.

Amboli Forest
Anuskura Ghat : घाटाच्या पायथ्याशी अवतरला स्वर्ग! पावसाळ्यात खुललं 'अणुस्कुरा'चं सौंदर्य, पर्यटकांसाठी मेजवानी

वनपाल पूनम घाडगे, वनरक्षक अमृता पाटील, बाळा गावडे, मंगेश सावंत, श्री. सरमळकर यांनी फलक लावले. याबाबत वनपाल घाडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबोलीतील जंगलात फिरण्यासाठी सध्या सायंकाळी ५ ते ७ पर्यंत परवानगी आहे. त्यासाठी आता १०० रुपये प्रतिव्यक्ती शुल्क आकारले जाणार असून, सायंकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत परवानगी मिळण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविला आहे.

Amboli Forest
Kaas Pathar : कास पठारावर 'या' दिवशी सुरू होणार 'फुलांचा हंगाम'; फुलं पाहण्यासाठी मोजावे लागणार 'इतके' रूपये

सध्या सायंकाळी ७ पर्यंत परवानगी आहे. वन उद्यान येथे १० रुपये शुल्क घेतले जाणार आहे. वन व्यवस्थापन समिती कर आकारणी करून त्यासोबत गाईड देणार आहे. वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनाही सांगण्यात येणार आहेत. विनाकारण रात्री कोणी राखीव वनक्षेत्रात आढळल्यास त्यावर वन विभागाची नजर असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.