प्रवासाला निघताय? आनंददायी प्रवासासाठी 'या' वस्तू सोबत असायलाच पाहिजेत

कोणत्याही ऋतूमध्ये ही प्रवास भटकंती करत असताना काही आवश्यक गोष्टी सोबत ठेवाव्यात.
Travelling
TravellingSakal
Updated on

तुम्हाला प्रवासाची आवड आहे? तुमच्यासाठी हिवाळा उन्हाळा किंवा पावसाळा यांपैकी कोणताही ऋतू असला तरी आता अडचण येणार नाही. पण कोणत्याही ऋतूमध्ये ही प्रवास भटकंती करत असताना काही आवश्यक गोष्टी सोबत ठेवाव्यात. जेणेकरून प्रवास करताना कमीत कमी त्रासाला तुम्हाला सामोरे जावे लागेल आणि तुम्ही मनसोक्तपणे प्रवासाचा आनंद घेऊ शकाल.

(Happy Travelling Tips)

नेमक्या कोणती गोष्टी सोबत असाव्याय याची यादी खास तुमच्यासाठी...

१) पाण्याची बाटली

तुम्ही प्रवासाला बाहेर असाल तर पाण्याची बाटली सोबत ठेवा. पाण्याची बाटली ठेवल्याने तहान लागली तेव्हा पाणी पिता येईल त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही आणि तुम्ही तुमचा प्रवास कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण करू शकाल.

२) ग्लुकोज पेय

पाण्याची बाटली असण्यासोबतच ग्लुकोज ड्रिंक घेणंही महत्त्वाचं आहे. एखाद्या वेळेला प्रवासात तुम्हाला काही खायला मिळणार नाही आणि उष्णता आणि आर्द्रतेमुळे तुम्हाला बीपी कमी जास्त झाली किंवा थकवा जाणवायला लागला तर तुम्ही जवळचे ग्लुकोज पेय काढुन ते पाण्यात मिसळून घेऊ शकता.

Travelling
पुन्हा मास्क घालावा लागणार, 'या' सार्वजनिक ठिकाणांचा समावेश

3) एनर्जी बार

प्रवासा करतांना जास्त खाणे किंवा जड अन्न पदार्थाचे सेवन करणे टाळा. कारण जास्त मसालेदार अन्न खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्यासोबत एनर्जी बार ठेवणे चांगले होईल. यामुळे तुमच्या शरीराला उर्जा मिळेल आणि तुमचे आरोग्य बिघडणार नाही.

4) टिशू पेपर

प्रवासा दरम्यान चेहरा धुण्यासाठी वेळोवेळी पाणी मिळेलच अस नाही. आणि प्रवासात धूळ, माती, ऊन यामुळे चेहरा तेलकट होऊ शकतो. आणि थकवा जाणवू लागतो. तेव्हा चेहरा पुसायला टिश्यू पेपरचा वापर करता येतो. त्यामुळे प्रवास करतांना टिशू पेपरचे पॅकेट सोबत ठेवल्यास बरे होईल.

Travelling
मागास विद्यार्थ्यांसाठी मिळणार UPSCचे मोफत प्रशिक्षण; केंद्राची योजना

5) सनग्लासेस

डोळयांचे उन्हापासुन तसेच धुळीपासुन संरक्षणासाठी तुमच्याकडे सनग्लासेस असणे आवश्यक आहे. सनग्लासेस घातल्याने तुम्हाला डोळ्याच्या समस्याचं येणार नाही.

6) सनस्क्रीन, सॅनिटायझर आणि प्रथमोपचार पेटी

या गोष्टी सोबत असल्या म्हणजे तुमचा प्रवास अविस्मरणीय होईल. सूर्याच्या तीव्र किरणांमुळे शरीर टॅन होते आणि हे टाळण्यासाठी सनस्क्रीन आवश्यक आहे. याशिवाय स्वच्छता राखण्यासाठी तुमच्यासोबत सॅनिटायझर असणेही आवश्यक आहे. आणि अचानक एखादी दुखापत झाली किंवा काही त्रास व्हायला लागला तर सोबत एक प्रथमोपचार पेटी असावी जेणेकरून आपण तात्पुरता ईलाज करु शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.