Heritage village : ग्रामिण जीवनाचा आनंद घ्यायचाय मग या हेरीटेज गावांना नक्की भेट द्या!

या ठिकाणी तूम्हाला भारताचा इतिहास जवळून जाणून घेता येईल
Heritage village
Heritage village esakal
Updated on

खरा भारत अनूभवायचा असेल तर भारतातील कोणत्याही खेड्यात जा. तिथे आजही ग्रामिण संस्कृती जपताना लोक पहायला मिळतात. तिथे आजही बैलाच्या मदतीने शेती केली जाते. आजही तिथल्या भिंती वारली चित्रांनी भरलेल्या असतात. तिथले जेवण चुलीवर होत नसले तरी त्याला एक ग्रामिण चव असते. हे सर्व अनूभवायचे असेल तर यंदाच्या हिवाळ्यात बाहेर फिरायला जाणार असाल तर अशा ठिकाणी जा जिथे हे सर्व तूम्हाला अनूभवायला मिळेल.

या स्थलांतरामुळे आज गावे ओसाड होत आहेत. गावांची परंपरा आणि संस्कृती हळूहळू लोप पावत आहे. ही वारसा परंपरा जतन करण्यासाठी हेरिटेज गावे बांधण्यात आली आहेत. भारतात अशी अनेक वारसा गावे आहेत. जिथे तुम्हाला भारताचा इतिहास जवळून जाणून घेता येईल.

Heritage village
Tour to Amboli : थंड हवेच्या ठिकाणांची राणी! पर्यटनाला इथे जाल तर फक्त निसर्ग अन् तुम्ही एवढच दिसेल

 प्रागपूर, हिमाचल प्रदेश

तुम्हाला माहीत आहे का की प्रागपूर हे भारतातील पहिले हेरिटेज गाव आहे? हे हेरिटेज गाव 16 व्या शतकाच्या उत्तरार्धात कांगडा जिल्ह्यातील जसवान राजघराण्यातील राजकुमारी प्राग देईच्या स्मरणार्थ स्थापित केले गेले. त्यांनी गावाची अनोखी आणि जुनी वास्तू टिकवून ठेवली आहे. आणि यामुळेच प्रागपूर खास बनले आहे. येथे तुम्हाला भारताचा जूना वारसा जाणून घेता येईल.  

Heritage village
Tour Near Goa : गोव्याला जायचं प्लॅन करताय? त्याआधी वाटेतल्या या ठिकाणांना नक्की भेट द्या

गरली, हिमाचल प्रदेश

प्रागपूरपासून लांब नसलेले, गरली हे वास्तुकला प्रेमींसाठी सर्वात आकर्षक ठिकाणांपैकी एक आहे. या गावात तुम्हाला फ्यूजन आर्किटेक्चरचे घटक सापडतील. गरली येथील प्रसिद्ध हेरिटेज हॉटेल्सपैकी एक आहे. हॉटेल फ्यूजन हे फ्युजन आर्किटेक्चरचे उत्तम उदाहरण आहे.

Heritage village
Best Tips For Wildlife Travel : जंगल सफारी करताना वाघाला...

किसामा, नागालँड

किसामा हेरिटेज व्हिलेज हे पोपुकर हॉर्नबिल फेस्टिव्हलचे ठिकाण आहे. हे नागालँडची राजधानी कोहिमा शहरापासून फक्त 12 किमी अंतरावर आहे. येथे तुम्ही नागालँडचे पारंपारिक नागा गाव पाहू शकता. तसेच, आपण नागालँडच्या संस्कृतीबद्दल अधिक जाणून घेऊ शकता.

रीक, मिजोरम

रीक मिजोरम हे मिझोरामच्या मामित जिल्ह्यात आहे. निसर्गाचा मुक्त वर्षाव असलेल्या या ठिकाणी तुम्ही ग्रामिण जीवन अनुभवू शकता. येथे गेल्यावर तुम्ही जंगल अधिक जवळून पाहू शकता. जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडत असेल तर रीक हेरिटेज व्हिलेजला नक्की भेट द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.