Best Tourism Villages: उत्तराखंडच्या 'या' 4 गावांना सर्वोत्तम पर्यटन गाव पुरस्कार; जाणून घ्या त्यांची खासियत

Best Tourism Villages Uttarakhand: हिमालयाच्या कुशीत वसलेली एक अनोखी जागा म्हणजेच उत्तराखंड 'देवभूमी' म्हणून प्रसिद्ध आहे आहे.
Best Tourism VIllages
Best Tourism VIllagesEsakal
Updated on

आंतरराष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त : उत्तराखंडमधील चार गावांना 'सर्वोत्तम पर्यटन गाव' पुरस्कारासाठी सन्मानित करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केली आहे. या उपक्रमाचा उद्देश राज्याला एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणं असून लोकांनी उत्तराखंडला भेट द्यावी हे त्यामागचं कारण ही आहे.

हिमालयाच्या कुशीत वसलेली एक अनोखी जागा म्हणजेच उत्तराखंड 'देवभूमी' म्हणून प्रसिद्ध आहे आहे. हे राज्य आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठीच नव्हे तर सांस्कृतिक वारसा आणि ग्रामीण पर्यटनासाठी देखील प्रसिद्ध आहे. या वर्षी उत्तराखंडच्या 4 गावांना 'सर्वोत्तम पर्यटन गाव' पुरस्काराने गौरवण्यात आलं असून यामुळे राज्यातील पर्यटन क्षमतांना प्रोत्साहन देण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी याबद्दल घोषणा करताना सांगितलं की जखोली (उत्तरकाशी), हर्षिल (उत्तरकाशी), सीमांत गुंजी (पिथौरागढ) आणि सूपी (नैनीताल) या गावांना त्यांच्या अनोख्या पर्यटन संधींमुळे या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. प्रत्येक गावाची स्वतःची एक खासियत आहे, जी त्यांना हा पुरस्कार निवडण्यात मदत करते.

या 4 गावांना पुरस्कार का मिळाले?

जखोलीला साहसी पर्यटनासाठी ओळखले गेले आहे, तर हर्षिल आणि सीमांत गुंजीला 'वायब्रंट विलेज' उपक्रमांतर्गत मान्यता मिळाली आहे. सूपी गावाला कृषी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. पर्यटन मंत्रालयाने आयोजित केलेल्या या वार्षिक स्पर्धेचा उद्देश अशा गावांना प्रोत्साहन देणे आहे, जे स्थानिक संस्कृती, नैसर्गिक वारसा आणि समुदाय आधारित मूल्यांचे संरक्षण करण्यात योगदान देतात.

Best Tourism VIllages
Hidden Places In Goa : गोव्यात नुसते बिचेस नाहीत, तर आहेत हे हिडन प्लेसेस; पहाल तर परत येण्याची इच्छाच होणार नाही

मुख्यमंत्री धामींना केला गावकऱ्यांच्या मेहनतीचा गौरव

मुख्यमंत्री धामींनी या प्रसंगी गावकऱ्यांच्या मेहनतीचे कौतुक केले आणि राज्य सरकार उत्तराखंडला प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून स्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असे म्हटले. उत्तराखंड आपल्या बर्फाळ पर्वत, तलाव, हिरव्यागार घाट्या आणि पवित्र मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे, आणि इथे अनेक रोमांचक अनुभव मिळतात. येथेची नैसर्गिक सुंदरता पाहण्यासारखी आहे. एकेकाळी उत्तर प्रदेशचा भाग असलेल्या उत्तराखंडमध्ये पर्यटकांना इथली नैसर्गिक सुंदरता खूप आकर्षित करते.

Best Tourism VIllages
पर्यटनानंतर दाजीपूर आता मधाचे गाव होण्याच्या मार्गावर; आमदार आबिटकरांचा उपक्रमासाठी पाठपुरावा सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.