भारतातील Lord Shri Krishnaची ही लोकप्रिय मंदीरं तुम्हाला माहित आहेत का?

भारतात श्रीकृष्णाची Lord Shri Krishna अनेक मंदिर असली तरी यातील काही मंदिरं Temples अधिक लोकप्रिय आहेत
Lord Krishna Famous Temples in India
Lord Krishna Famous Temples in IndiaEsakal
Updated on

केवळ भारतातच नव्हे तर देशभरामध्ये भगवान श्रीकृष्णाचे लाखो भक्त आहेत. भारतासह देशातील विविध कानाकोपऱ्यांमध्ये श्रीकृष्णाची मंदिर Temples असल्याचं पाहायला मिळतं. भारतातही श्रीकृष्णाची असंख्य मंदीर आहेत. यातील अनेक मंदिरांमध्ये भक्तांची Devotees कायम गर्दी पाहायला मिळते. Hindu Religion Story in Marathi Know about these temples of Lord Shri Krishna

या मंदिरांमध्ये सणा-सुदीच्या दिवसांमध्ये खास सजावट पाहायला मिळते. भारतात श्रीकृष्णाची Lord Shri Krishna अनेक मंदिर असली तरी यातील काही मंदिरं Temples अधिक लोकप्रिय आहेत. यातीलच १० मंदिरांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या मंदिरांमध्ये संपूर्ण वर्षभर भक्तांची Devotees गर्दी पाहायला मिळते.

द्वारकाधीश मंदिर द्वारका, गुजरात

चार धामपैकी एक पश्चिम भागातील धाम म्हणजे गुजरातमधील Gujarat द्वारकाधीश मंदिर. गोमती नदीच्या तिरावर हे मंदिर वसलेलं आहे. जवळपास ४३ मीटर उंचीवर या मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे. हे मंदिर जवळपास अडीच हजार वर्ष जुनं आहे. हे मंदिर म्हणजे केवळ मुख्य गृह असून श्रीकृष्णाची संपूर्ण द्वारका नगरी मात्र समुद्रात आहे.

या मंदीराची निर्मिती श्रीकृष्णाचे पणतू वज्रनाथ यांनी केली होती. त्यानंतर वेळोवेळी मंदिराचा विस्तार आणि जीर्णोद्धार करण्यात आला.

श्री बांके बिहारी मंदिर, वृंदावन

श्रीकृष्णाचं बालपण हे वृंदावनमध्ये बागडण्यात गेलं. मथुरेतील वृंदावनमध्ये श्रीकृष्णाचं हे खास मंदीर आहे. श्रीकृष्णाला बांके बिहारी म्हंटलं जातं असल्याने याच नावाने हे मंदिर ओळखलं जातं. या मंदिरामध्ये श्रीकृष्णाची काळ्या रंगातील प्रतिमा असून दरवर्षी मार्गशिष महिन्यातील पंचमीला इथं बिहारीजी म्हणजेच श्रीकृष्णाचा प्रकोटोत्सव साजरा केला जातो.

हे देखिल वाचा -

Lord Krishna Famous Temples in India
Sai baba Temple : साईबाबांच्या काळातील शिर्डी कशी होती? पहा शिर्डीचे जूने फोटो

श्रीकृष्ण मठ, उड्डपी

कर्नाटकमधील श्रीकृष्णाचं हे अत्यंत लोकप्रिय असं मंदिर आहे. या मंदिराची खासियत म्हणजे इथं लाडक्या श्रीकृष्णाची थेट पूजा करता येत नाही. तर खिडकीला असलेल्या ९ छिद्रांमधूनच श्रीहरीची पूजा केली जाते. वर्षभर इथे भक्तांची वर्दळ पाहायला मिळते.

जग्गनाथपुरी, ओरिसा

श्रीकृष्णाचं हे मंदिर ओरिशा राज्यातील पुरी शहरात आहे. हे मंदिर जगन्नाथ, बलभद्र आणि सुबद्रा या त्रिदेवांच्या पूजेसाठी प्रसिद्ध आहे. पुरीतील हे मंदिर एक शक्तिपीठ असल्याने या स्थानाच्या महत्त्वाची अस्मिता आहे. जगन्नाथ पुरी मंदिराची निर्मिती सन ११८६ मध्ये करण्यात आली होती.

जग्गनाथ पुरी मंदिरामध्ये दरवर्षी रथयात्रा आयोजित केली जाते. हा रथ ओढण्यासाठी भारतातीलच नव्हे तर देशभरातली भक्त पुरीमध्ये गर्दी करतात.

सावलिंया सेठ मंदिर राजस्थान

राजस्थानमधील चित्तोडगढपासून काही किलोमीटर अंतरावर असलेलं हे मंदिर अतिशय सुंदर असं मंदिर असून इथली वास्तूकला देखील खास आहे. पौराणिक कथांनुसार मीरा ज्या श्रीहरीची भक्ती करायची तेच हे सांवलिया सेठ. या मंदिरामध्ये वर्षभर भक्तांची रेलचेल पाहायला मिळते. तसचं भक्तांसाठी इथे दर महिन्याला भंडाऱ्याचं आयोजनही केलं जातं.

भालका तीर्थ, गुजरात

गुजरातमधील सोमनाथ इथं हे मंदिर असून याच ठिकाणी एका शिकाऱ्याने हरण समजून ध्यानाला बसलेल्या श्रीकृष्णाला तीर मारला होता. इथेच भगवान श्रीकृष्णाने पृथ्वीलोकाचा निरोप घेतला आणि तो स्वर्गलोकी गेला. या ठिराणी एक पिंपळाचं झाडं असून ते ५ हजार वर्ष जुनं असल्याचं म्हटलं जातं. याच झाडाखाली श्रीकृष्णाने प्राण त्यागले होते.

या मंदिरांशिवाय कर्नाटक राज्यातील हंपी इथं असलेलं बालकृष्ण मंदिर, राजस्थानमधील श्रीनाथजी मंदीर आणि केरळमधील गुरूवयूर मंदिर ही श्रीकृष्णाची मंदिरं देखील अत्यंत लोकप्रिय आहेत.

हे देखिल वाचा-

Lord Krishna Famous Temples in India
Ganesh Temple : अंबडचा पुरातन सिद्धिविनायक गणपती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.