Historical Manthangad : आंध्रप्रदेशातील मंथनगडावरील शिळा एक न सुटलेलं कोडं!

शोधाव्या लागतील इतक्या बारीक आकारातील अशा आकृती भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत
Historical Manthangad : आंध्रप्रदेशातील मंथनगडावरील शिळा एक न सुटलेलं कोडं!
Updated on

हैद्राबाद रायचूर बस मार्गावर मतकल पासून १० कि. मी. अंतरावर असलेले मंथनगड हे एक दिव्य क्षेत्र आहे. गुरुचरित्रातील १० व्या अध्यायात त्याचा उल्लेख आढळतो. दत्त परीक्रमेतील एक महत्त्वाचे स्थान म्हणून या क्षेत्राची महती आहे.

मंथनगडाच्या मंदिराच्या परिसरात अनेक मोठ्या शिळा आहेत. त्या शीळा तिथे कशा आल्या याबद्दल फारशी माहिती नाही. मात्र तिथल्या प्रत्येक दगडावर एक विशिष्ठ प्रतिकृती कोरलेली दिसते. तिथे भेट देणाऱ्या प्रत्येक भाविकाला त्या शीळांवरील आकृती आश्चर्यचकीत करतात.  

 त्यापैकी एका शिळेवर श्री मारूतीरायाच्या चेहऱ्याची प्रतिकृती दिसते. तर त्याच्या बाजूला ओम दिसतो. काही दगडांचे आकार हे गरूड, घोडा याच्या आकाराचे आहेच. तर, एकेठिकाणी हत्ती आणि मगर यांचे आकार आहेत. या भव्यदिव्य शिळा आणि त्यावर शोधाव्या लागतील इतक्या बारीक आकारातील अशा आकृती भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत.

 मंथनगड आणि दत्त भक्ताची पौराणिक कथा

कश्यप गोत्रातील श्री वल्लभेश नावाचा एक व्यक्ती श्रीपाद श्रीवल्लभांचा एकनिष्ठ भक्त होता. तो वारंवार कुरवपुरी येत असे. श्री पादुकांची सेवा करीत असे. पूजा अर्चा करीत असे वं श्रीक्षेत्री मोठ्या प्रमाणात अन्नदानही करीत असे. एकदा त्याने आपली मनोकामना श्री चरणी प्रकट केली व नवस केला. की जर माझी इच्छा पूर्ण झाल्यास मी श्री चरणी मोठी सेवा करेन. सहस्त्र ब्राह्मणास भोजन अर्पण करीन.

भक्त काम कल्पदृम अशा श्रीपादांच्या कृपेने त्याला शतगुणा फायदा झाला. तो अत्यंत आनंदी झाला व श्रीगुरुस्थानी नवस फेडण्यास व श्री गुरुचरणी कृतज्ञतेने सेवा करण्यास कुरावपूरकडे निघाला. नवस फेडण्यास द्रव्य व साधनसामुग्री घेऊन निघाला. काही तस्करांनी कपटाने त्याचा विश्वास संपादन केला व आपणही दरवर्षीच्या नियमानुसार श्री क्षेत्रीच जात असल्याचा निर्वाळा दिला. वल्लभेश ब्राम्हणाने त्यांच्याबरोबरच प्रवास सुरु केला.

एके दिवशी त्या दरोडेखोरांनी त्याला झोपेतच ठार केले. श्रीपाद श्रीवल्लभ सर्वच जाणतात ते त्यांच्या एकनिष्ठ सेवकासाठी धावून आले. त्यांनी आपल्या त्रिशूळानी तिघांना मारले एक त्यातील एक श्रीचरणी नतमस्तक झाला क्षमा मागितली व म्हणाला स्वामी आपण सर्वज्ञानी आहात, आपणास माहिती आहे. मी निर्दोष आहे तर आपण मला जीवदान द्या.

भक्तवत्सल श्रीपादांचे मनात दया आली. व त्यांनी त्याचे हाती विभूती दिली व वल्लभेश ब्राम्हणाच्या गळ्यास लावून मस्तक धडास जोडण्यास सांगितले. आणि काय आश्चर्य! वल्लभेश उठून बसला, व त्यास आश्चर्य वाटले की हे सहप्रवासी भक्त यांना कोणी बरे मारले? तेव्हा त्या तस्करांने सर्व हकीकत त्या ब्राह्मणास सांगितली व म्हणाला "अरे ते संन्यासी कोठे गेले? आत्ता येथे होते." वल्लभेश तर जे समजायचे ते समजून गेला. ज्याठिकाणी श्रीपादश्रीवल्लभ प्रकट झाले ते स्थान म्हणजे मंथनगड. यास्मृती प्रित्यर्थ तेथे गुरु मंदिर बांधण्यात आलेलें आहे.

मंथनगडला कसे जायचे

श्री क्षेत्र मंथनगड हे ठिकाणहैद्राबाद रायचूर बस मार्गावर मतकल पासून हे क्षेत्र १० कि. मी. अंतरावर आहे. मतकल या गावापासून येथे जाण्यासाठी रिक्षा अगर बस मिळतात. मतकल-नरवा आणि मतकल-उजेकोट या बसेस मंथनगडला जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.