शोले हा चित्रपट तूम्ही अनेकवेळा पाहिला असेल. त्यातील गब्बर त्याच्या साथीदारांना विचारतो की, होली कब है. होळीच्या दिवशीच तो एक प्लॅन आखतो आणि गावावर हल्ला करतो. तेव्हापासून गब्बरचा तो डायलॉग फेमस आहे. पण, भारतातल्या एका गावावर तो हा डायलॉग कधीच मारू शकत नाही. कारण, आपल्या देशात एक असं गाव आहे ज्याने गेल्या ७० वर्षांपासून होळीच साजरी केली नाहीय.
होय, राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील हरणी या गावाने ७० वर्षांआधीच होळीवर बॅन आणला आहे. त्या गावात होळीचा उत्साह पहायाला मिळत नाही. यामागील कारणही तसेच आहे. जे लोकांच्या भावना आणि दु:खाशी जोडलेले आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून काहीच वर्ष झाल्याने सगळे सण-समारंभ लोक उत्साहाने साजरे करत होते. त्यामूळे ७० वर्षांआधी हिरणी गावात होळीच्या पोर्णिमेला मोठ्या उत्साहाने लोक सहभागी झाले होते. पण, दुधात मिठाचा खडा पडावा तसा लोकांच्या आनंद फार काळ टिकला नाही. गावातील लोकांनी होळी पेटवली. पण, ती होळी गावकऱ्यांसाठी अशूभ ठरली.
होळीचे झाड पेटवताच ते झाड कोसळले आणि त्यामूळे संपूर्ण गावाला आग लागली. लोकांची घरे, जनावरे त्या आगीत जळून खाक झालीत. लोकांना खूप मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागला होता. त्यामूळेच या गावातील लोकांनी होळी अशाप्रकारे साजरी न करण्याचा निर्णय घेतला.
अशी साजरी होते तिथे होळी
आता गावातील लोक साध्या पद्धतीने होळी साजरी करतात. ग्रामस्थांनी देणगी देऊन चांदीची होलिका आणि सोन्याच्या भक्त प्रल्हादाची मूर्ती बनवली आहे. होळीच्या सणाच्या दिवशी गावात असलेल्या 500 वर्ष जुन्या श्री हरणी श्याम मंदिरातून मिरवणुकीच्या या मूर्ती होलिका दहनाच्या ठिकाणी आणल्या जातात. जिथे सर्व समाजाचे लोक प्रार्थना करतात. नंतर ती मंदिरात ठेवली जाते. तेव्हापासून आजतागायत ही परंपरा पाळली जात आहे.
गावकरी काय म्हणतात
ग्रामस्थ महादेव जाट म्हणाले की, या निर्णयानंतर गावात कधीच होलिका दहन झाले नाही. त्यामुळे जाळपोळ थांबली आणि या परंपरेमुळे झाडांचे रक्षणही झाले. आमच्या पूर्वजांनी घेतलेल्या निर्णयामुळे आम्ही खूप आनंदी असून ही परंपरा पुढे नेत असल्याचे युवक मोहन लाल यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.