हनिमूनसाठी भेट द्या महाराष्ट्रातील या ठिकाणांना

लग्नानंतर प्रत्येकाची हनिमुनला जाण्याची इच्छा असते
honeymoon
honeymoonHoneymoon
Updated on

आजच्या काळात कोणालाच वेळ नाही असे म्हटले जाते. धकाधकीच्या जीवनात सर्व अडकले आहेत. यामुळे स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी वेळ काढता येत नाही. लग्नासाठी आधीच सुट्टी काढलेली असते. यामुळे जास्त सुटीही घेता येत नाही. अशावेळी हनिमूनसाठी (Honeymoon) वेगळी सुटी काढण्याचा प्रश्नच येत नाही. मग शनिवार, रविवारला जोडून एखादी सुटी घेत महाराष्ट्रात (Destinations in Maharashtra) जवळपास हनिमुनला जाता येईल.

लग्नानंतर प्रत्येकाची हनिमुनला जाण्याची इच्छा असते. पती-पत्नी यांनी एकट्यात वेळ घालवावा, असे वाटते. एकमेकांना समजून घेण्याचा हाही त्या मागचा उद्देश असतो. मात्र, नोकरी (Job) आणि व्यवसायामुळे (Business) अनेकांना ते शक्य होत नाही. अशावेळी जवळच आणि कमी खर्चाच हनिमुनसाठी कुठे जाता येईल हे आज आपण पाहणार आहोत...

honeymoon
प्रेयसीने बुरखा घातला म्हणून प्रियकराला मारहाण; व्हिडिओ व्हायरल

इगतपुरी

हनिमून आणि पर्यटन असा कॉम्बो पॅक देणारे इगतपुरी हे थंड हवेचे ठिकाण आहे. नाशिकपासून जवळ असल्याने जाण्यायेण्याच्या सोयी सुद्धा उत्तम आहेत. इथले आल्हाददायी वातावरण तुमच्या आणि जोडीदाराच्या मनाला रिफ्रेश करेल.

म्हैसमाळ

औरंगाबादचे महाबळेश्वर म्हणजे म्हैसमाळ. आल्हाददायी हवा, मोकळे वातावरण आणि निसर्गासोबत एलोरा लेणी, देवगिरी किल्ला आणि घृष्णेश्वर मंदिर ही प्रेक्षणीय स्थळे येथे आहेत.

सूर्यमाळ

ठाणे जिल्ह्याच्या मोखाडा तालुक्यातील ‘सूर्यमाळ’ येथील निसर्गरम्य आणि शांत वातावरण नक्कीच तुम्हाला शहरी गोंगाटापासून दूर ठेवेल. पावसाळ्यात खाली उतरणारे ढग, हिवाळ्यातली धुक्याची चादर आणि गुलाबी थंडी तुम्हाला सुखावून जाईल. तंबू सोबत घेऊन गेलात तर रात्री चांदण्यांनी भरलेले आभाळ तुमच्या गप्पांमध्ये सामील होईल.

रतनवाडी

दरी खोऱ्यातून भटकायचे असेल तर रतनवाडी हा उत्तम पर्याय आहे. ४०० वर्षे जुन्या रतनगडाच्या पायथ्याशी वसलेले ३०-४० घरांचे रतनवाडी कपल्स साथी एक हॉट डेस्टिनेशन आहे. रतनवाडी परिसरात अनेक धबधबे असून ‘नेकलेस फॉल’ विशेष लोकप्रिय आहे.

काशीद

पांढरीशुभ्र स्वच्छ वाळू आणि निळ्या समुद्रासाठी प्रसिद्ध असलेला काशीद बीच (अलीबाग, रायगड) महाराष्ट्रातील आवडते हनिमून डेस्टिनेशन आहे. ज्या जोडप्यांना शांततेशिवाय काहीही अनुभवायचे नाही त्यांच्यासाठी हा निळा समुद्र चांगला सोबती आहे.

honeymoon
दारूवरील उत्पादन शुल्कात ५० टक्के कपात; नवे दर जाहीर

भंडारदरा

धबधबे, डोंगर, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा हे अहमदनगर येथील भंडारदऱ्याच्या सौंदर्यात भर टाकतात. भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहेत.

चौल

अलीबाग येथील चौल हे चाफ्याचे गाव. गावात सगळीकडे बहरलेली चाफ्याची झाडे दिसतात. हे गाव आपल्याला २००० वर्षे मागे घेऊन जाते. शहरी धकाधकीपासून निवांत आणि झाडांच्या कुशीत लपलेले चौल मधुचंद्र अविस्मरणीय बनवेल यात शंका नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()