Honeymoon : सप्टेंबरमध्ये हनीमून प्लॅनिंगसाठी देशातील बेस्ट ठिकाणं; नक्की जा!

लग्नानंतर दोघांनाही एकमेकाला क्वालिटी टाईम देता यावा यासाठी हनीमूनचं प्लॅनिंग केलं जातं.
Honeymoon plan in saptember
Honeymoon plan in saptember
Updated on

कोणत्याही जोडप्यासाठी हनीमूनचा काळ हा बेस्टच असतो. नव्या जोडप्याला एकमेकांना जाणून घेण्यासाठी हा काळ परफेक्ट असतो. कारण बरीच लग्नही अॅरेंज मॅरेज असतात आणि मग जर का लग्न धावपळीत झालं असेल तर एकमेकांबद्दल फारशी माहिती नसते. त्यामुळे लग्नानंतर दोघांनाही एकमेकाला क्वालिटी टाईम देता यावा यासाठी हनीमूनचं प्लॅनिंग केलं जातं. (Honeymoon plan in saptember)

अनेकजणांना काही ना काही कारणाने हनीमूनसाठी जाता येत नाही. किंवा हनीमूनचं प्लॅनिंग जर देश किंवा राज्याच्या बाहेर असेल तर मात्र त्या प्रदेशांची माहिती आपल्याकडे नसते. अशावेळी बरेच प्लॅन फसू शकतात. त्यामुळे आधी तयारी करुन ठेवलेली केव्हीही उत्तम असते. कोणत्या ठिकाणी हनीमूनला जावं हा एक प्रश्न अनेक जोडप्यांना पडलेला असतो. तुमच्या या प्रश्नासाठी आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत.

अनेकांना हनीमूनसाठी एखादा रोमॅंटिक शहर किंवा प्रदेश सूचणं म्हणजे टेन्शन येतं. तुम्ही सप्टेंबर महिन्यात हनिमूनसाठी प्लॅन करु शकता. हा महिना थोडा पावसाळी असतो आणि ही मजा अनुभवणे वेगळं असतं. तुम्ही या महिन्यात हनिमूनला जाण्याचा विचार करत असाल तर भारतातील या काही सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता.

Honeymoon plan in saptember
Tourism : देशाचे ऐक्य दाखवणारे भारत मातेचे मंदिर तूम्ही पाहिले का?

लेह लडाख

सुंदर लॅंडस्केप आणि दृश्यांसाठी प्रसिद्ध असलेले लेह लडाख हे हनीमूनसाठी बेस्ट ठिकाणांपैकी एक आहे. तुम्ही या ठिकाणी प्लॅन करु शकता.

शिलॉंग

तुमच्या हनीमूनसाठी पावसाळ्यात शिलॉंग हे एक बेस्ट ठिकाण आहे. जर तुम्हाला पार्टनरसोबत शांत, रम्य ठिकाणी जायचे आहे तर तुम्ही या देशाचा प्लॅन करु शकता.

श्रीनगर

तुमच्या जोडीदारासोबत खास क्षण घालवण्यासाठी तुम्ही श्रीनगरला जाऊ शकता. इथे असणाऱ्या काही प्रसिद्ध तलावांना तुम्ही भेट देऊ शकता. येथील नदी काठांवर रोमान्सची मजा काही औरच असते.

Honeymoon plan in saptember
Adventure sports: तुम्हालाही काही ऍडव्हेंचर करायचे आहे का? मग या ठिकाणांना नक्की भेट द्या

केरळ

सुंदर निसर्गात तुमच्या जोडीदारासोबत रोमॅंटिक क्षण घालवण्यासाठी तुम्ही केरळला जाऊ शकता. सप्टेंबरला केरळचे हवामान खूपच अल्हाददायक आणि रोमॅंटिक असते.

उटी

निलगिरी जिल्ह्यात असलेले उटी हे हनीमूनसाठी एक बेस्ट ठिकाण आहे. काही निवडक ठिकाणांपैकी हे एक महत्वाचे ठिकाण होऊ शकते. येथे भेट दिल्यावर तुम्ही उतारावरचे डोंगर, हिरवाई आणि बरेच निसर्गसौंदर्य अनुभवू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()