Houseboat Travelling : पहा कुठे मिळेल हाऊसबोटमध्ये राहण्याचा संस्मरणीय अनुभव; ही आहेत ठिकाणं

सूर्याची कोवळी किरणे अंगावर आल्यावर जाग येते
Houseboat Travelling : पहा कुठे मिळेल हाऊसबोटमध्ये राहण्याचा संस्मरणीय अनुभव; ही आहेत ठिकाणं
Updated on

पूणे : सूर्याची कोवळी किरणे अंगावर आल्यावर जाग येते. तूम्ही उठून खिडकीतून बाहेर डोकावता तर तिथे तूम्हाला पाणीच-पाणी दिसते. थोडे केस बाजूला सारत तूम्ही बाहेर येता आणि आश्चर्यचकीत होता. कारण बाहेर निळीशार पसरलेली पाण्याची चादर आणि सभोवती उंच डोंगर, माडाची झाडे आणि पक्षांचा किलबिलाट. तूम्ही सत्यात येता आणि मग लक्षात येते की, तूम्ही हाऊसबोटमध्ये आहात.

Houseboat Travelling : पहा कुठे मिळेल हाऊसबोटमध्ये राहण्याचा संस्मरणीय अनुभव; ही आहेत ठिकाणं
Travelling : फिरायला जा आणि निरोगी राहा

अनेक ठिकाणी फिरताना तुम्ही कधीही हाऊसबोटमध्ये राहण्याचा आनंद घेतला आहे का?. नसेल तर हा अनुभव एकदा घ्यायलाच हवा. यासाठी केरळला जायची गरज नाही. भारतातल्या इतर पर्यटन ठिकाणीही हा अनुभव घेता येऊ शकतो. हाऊसबोट्स म्हणजे मोठे आत्याधुनिक क्रूझ किंवा बोट नव्हे. हाऊसबोट्स म्हणजे आकाराने मोठ्या, संथ गतीने चालणार्‍या विशेष बोटी आहेत. या जून्या तट्ट्याच्या बोटींमध्ये राहण्याचा अनुभवही घेता येतो.पूर्वी या बोटींचा उपयोग तांदूळ आणि मसाल्यांच्या वाहतुकीसाठी केला जात असे. एक हाऊस बोट कुट्टानाड ते कोची बंदरात 30 टन माल वाहून नेला जात होता.

Houseboat Travelling : पहा कुठे मिळेल हाऊसबोटमध्ये राहण्याचा संस्मरणीय अनुभव; ही आहेत ठिकाणं
Travel : स्ट्रेस पळवण्यासाठी भारतातले हे धबधबे एक उत्तम ट्रीप प्लॅन असू शकतात

केरळ

या हाऊसबोट्स तुम्हाला छान बेडरूम, आधुनिक टॉयलेट्स, सुंदर लिव्हिंग रूम, स्वयंपाकघर आणि मोठी बाल्कनी आहे. त्यामुळे एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये राहील्यासारखेच तूम्हाला वाटेल. तिथल्या बहुतेक बोटींमध्ये स्थानिक कामगार असतात. तर काही बोटींना इंजिन बसवलेले असतात. केरळमध्ये तिरुअनंतपुरम, कोल्लम, कोट्टायम, अलाप्पुझा, एर्नाकुलम, त्रिशूर आणि कासारगोड येथे हाउसबोट्स उपलब्ध आहेत.

कर्नाटक

देशात एकमेव बॅकवॉटर आहे जे हाऊसबोट भाड्याने देते. कर्नाटकातील उडुपीमधील स्वर्ण नदीवर या हाऊसबोटमध्ये फिरण्याचा अनुभव घेता येतो. कर्नाटकातील निसर्गाचा अद्भूत खजिना या बोटीतून पाहता येतो. या नदीच्या तिरावरची संस्कृतीने समृद्ध असलेली गावे, नारळाची झाडे आणि नदीचे सौंदर्य जवळून पाहता येते.

Houseboat Travelling : पहा कुठे मिळेल हाऊसबोटमध्ये राहण्याचा संस्मरणीय अनुभव; ही आहेत ठिकाणं
Diwali Travel : राजस्थानमधील या शहरात दिवाळी असते खास; असे करा प्लॅनिंग

गोवा

गोव्यातील सर्वात अविस्मरणीय अनुभव म्हणजे चापोरा आणि मांडोवी नदीवरील हाऊसबोट. या हाऊसबोटवर एक दिवसाचे पॅकेज दिले जाते. एक पूर्ण दिवस तूम्हाला बॅकवॉटरभोवती घालवता येतो. सायंकाळी मनोरंजनाचे, गाण्याचे कार्यक्रम असतात. त्यात तूम्हीही सहभागी होऊ शकता. या प्रवासात गोव्याचे पारंपरिक जेवण दिले जाते. या एक दिवसात गोव्यातील छोटी पण आकर्षक गावे, नारळाच्या बागा, मासेमारीची ठिकाणे, किल्ले पाहता येते.

श्रीनगर

हिवाळ्यात पर्यटकांची गर्दी काश्मिरला होते. त्यामुळे इथेही हाऊमबोटचा राहण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर दाल लेकवर भेट द्यावी लागेल. इथे अनेक वेगवेगळ्या हाउसबोट्स आहेत. ज्यामधून तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रवासाचा अनुभव घेऊ शकता. इथे कपल्ससाठी वेगवेगळ्या हाऊसबोट्स आहेत.

Houseboat Travelling : पहा कुठे मिळेल हाऊसबोटमध्ये राहण्याचा संस्मरणीय अनुभव; ही आहेत ठिकाणं
Nashik : Travel Busesची पोलिसांकडून काटेकोर चेकिंग ; अग्नितांडवानंतर 1 बस जप्त

तारकर्ली

महाराष्ट्रात बॅकवॉटर असलेले एकमेव ठिकाण तारकर्ली आहे. येथे, हाऊसबोट राइड अत्यंत कमी दरात करता येते. या हाऊसबोटवर प्रवासाचा अनुभव घेताना तुम्ही अनेक जवळच्या समुद्रकिनाऱ्यांना भेट देऊ शकता. येथे स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, वॉटर बाईक रायडींगचा अनुभव घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()